Hot Posts

6/recent/ticker-posts

अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या हर्ष-उल्हासा मध्ये साजरा.....

 


•- जवळपास 20 हजार भाविक भक्तांची प्रगट दिन सोहळ्याला उपस्थिती.

•-  मोशी प्राधिकरणाला अक्षरशः पंढरपुराचे स्वरूप प्राप्त झाले होते.

•- संघर्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज भाऊ पवार यांच्या आयोजना चे सर्वत्र कौतुक आणि स्वागत.


            पिंपरी चिंचवड ता.१५-: शहरातील मोशी प्राधिकरण सेक्टर नंबर चार येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

प्रगट दिन सोहळ्याला आमदार महेश दादा लांडगे यांची उपस्थिती.
 

        या कार्यक्रमाचे आयोजन मोशी प्राधिकरण सेक्टर नंबर 4 येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि दमदार आमदार महेश दादा लांडगे यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू मानले जाणारे व संघर्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री पंकज भाऊ पवार आणि अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न झाला.


       संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान मानले जाणारे आणि अतिशय जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर.
            ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी स्वामी महाराजांच्या प्रकट दिना निमित्त दिवसभर वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये रक्तदान शिबिर,  आरोग्य शिबिर, सुगम संगीताचा कार्यक्रम, सांप्रदायिक भजन, वारकरी संपूर्ण परिसरामध्ये पालखी सोहळा काढण्यात आला या पालखी सोहळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाविकांनी सहभाग घेतला विशेषता महिला भक्तांनी स्वामींचा जयघोष करत आनंद लुटला यानंतर सायंकाळी मंदिरामध्ये महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते. जवळपास 20 हजार लोकांनी स्वामी महाराजांचा दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. 


        या कार्यक्रम प्रसंगी हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हिंदुतेज सूर्य धनंजय भाई देसाई, भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे, संघर्ष संस्थेचे अध्यक्ष पंकज भाऊ पवार, माजी नगरसेविका नम्रता ताई योगेश लोंढे, विलास मडगिरी, निलेश शेठ बोराटे, प्राध्यापक राजेस सस्ते, निखिल बोराडे, तुषार भाऊ सहाने, सरिता ताई पायमोडे, व आधी मान्यवर या कार्यक्रमा दरम्यान उपस्थित राहिले.


          धनंजय भाई देसाई यांनी भाविकांना शुभेच्छा देतेवेळी खऱ्या अर्थाने या संत नगरला संतांचं रूप आलं, भक्तांचे मांदियाळी पाहून पंढरीचे रूप आल्यासारखं त्यांनी सांगितलं, त्यावेळेस संस्थेचे संस्थापक पंकज भाऊ पवार यांनी सर्व मान्यवरांचा स्वागत करून सन्मान करण्यात आला व आभार व्यक्त केले या सर्व सोहळ्याला आपल्या सर्व माता भगिनी व सर्व भाविक भक्तांनी योगदान दिले.



Post a Comment

0 Comments