• नऊ वर्षा च्या स्वराज पंकज पवार या मुलाने सलग बारा तास पायी चालून स्वामींचे दर्शन घेऊन सर्वांचे लक्ष वेधले..
मोशी प्राधिकरण -: पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ मंदिर मोशी प्राधिकरण ते अक्कलकोट पाई वारीचे सुंदर असे नियोजन देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते पंकज भाऊ पवार यांनी केले. यामध्ये पुण्याहून सोलापूर पर्यंत रेल्वेने प्रवास केला, त्यानंतर सोलापूर ते अक्कलकोट हा प्रवास पायी चालत करण्यात आला.
हा पायी प्रवास करत असताना तब्बल 12 तासांचा चा वेळ लागला. हा प्रवास करत असताना पाईवारीतील असंख्य सेवेकरी लहान थोर , माता भगिनी यांनी न थकता न थांबता आपले आराध्य ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ यांचे नामाचा जयघोष करीत दर्शन घेण्याकरिता प्रवास केला..
•नऊ वर्षाच्या 'स्वराज पंकज पवार' याने सर्वांचे लक्ष वेधले.
पायी वारी करीत असताना असंख्य सेविकाऱ्यांच्या गर्दीत सर्वांचे लक्ष वेधले ते नऊ वर्षाच्या स्वराज पंकज पवार या चिमुकल्याने कारण इथे थोरामोठ्यांना तब्बल 12 तास चालणं कठीण होत असताना या चिमुकल्याने न थकता न थांबता आणि न कुठलीही तक्रार करता तब्बल 12 तास पायी चालत स्वामींचे दर्शन घेतले यामुळे सर्वांनी त्याचा कौतुक केले..
0 Comments