Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर चिंचवड स्टेशन येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

 


 • जगाला आनंदी आणि सुदृढ करूया, चला सर्व योगाकडे वळूया.

      चिंचवड -: आज जागतिक योग दिवस असल्याने चिंचवड स्टेशन येथील श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर येथे जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


 

     या कार्यक्रमास योग गुरु श्री.कुमार कटके सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिशुविहार व इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग घेतला.

                सर्वांनी एकात्मतेने व मनःशांतीचा अनुभव घेतला. प्रशालेतील सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांबरोबर सहभागी झाले होते. योग साधनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला. सर्वांच्या आरोग्य व समृद्धीसाठी ओमकार जप करण्यात आला. योग जीवनशैली आहे व्यायाम नाही ही  विचारधारा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात आली. 

      या उपक्रमासाठी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे मानद सचिव माननीय ॲड .श्री राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा व सहाय्यक सेक्रेटरी माननीय प्राध्या.श्री.अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया  यांनी मार्गदर्शन केले अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा काटकर यांनी दिली.

   


Post a Comment

0 Comments