Hot Posts

6/recent/ticker-posts

महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखडा संदर्भात सूचना व हरकतींची प्रत नागरिकांना वाटप - मारुती भापकर

 

       

        पिंपरी चिंचवड  दि.१७/६/२०२५ -: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखडा (डिपी) जाहीर करण्यात आला आहे. या विकास आराखड्या बाबत सूचना व हरकती देण्यासाठी ६० दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे.३० दिवसाचा कालावधी संपलेला असून. आणखी १८ जुलै पर्यंत सूचना व हरकती नोंदवण्याची संधी नागरिकांना आहे.

       या विकास आराखड्याबाबत सूचना व हरकतीची प्रत बनवण्यात आलेली आहे. मोहननगर, रामनगर काळभोरनगर मधील नागरिकांना देण्यात आलेली आहे. आम्ही दिलेल्या हरकती सूचनाबाबत आपल्या सद सद विवेक बुद्धीने विचार करून त्यामध्ये काही बदल असतील तर ते करून या मसुदा प्रतीच्या झेरॉक्स मारून आपल्या आजूबाजूच्या लोकांना या प्रती देऊन त्यांच्या स्वाक्षरी घ्याव्यात. या हरकत, सूचना इंडिव्हिजन प्रत्येक नागरिकांनी नोंदवुन जास्तीत जास्त हरकती आपल्या विभागातून नागरिकांनी नोंदवल्या पाहिजे. 


         आपण या सर्व स्वाक्षरी,पत्ता व मोबाईल नंबर टाकलेल्या हरकती सोमवार दि.२३/६/२०२५ रोजी पिंपरी येथील महापालिका मुख्यालयाच्या आऊट गेटला सकाळी ११.००वा.मोठ्या संख्येने जमून या हरकती नोंदवणार आहोत.तरी मोहन नगर, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर,विद्यानगर मधील नागरिकांना या प्रक्रिया मोठ्या संख्येने भाग घ्यावा ही नम्र विनंती. असे आवाहन आहे मारुती भापकर, महादेव नेर्लेकर -नागरी हक्क कृती समिती मोहननगर काळभोरनगर रामनगर महात्मा फुलेनगर दत्तनगर विद्यानगर चिंचवड स्टेशन आनंदनगर साईबाबानगर, इंदिरानगर शंकर नगर, परशुराम नगर यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments