Hot Posts

6/recent/ticker-posts

शिव-शंभुभक्तांच्या संकल्पनेतील धर्मवीरगड विकास आराखडा..

 

   

       श्रीगोंदा:  पेडगाव येथील किल्ले धर्मवीरगडाच्या विकासा संदर्भात आराखडा खालील प्रमाणे असावा. 

  राज्यातील शिव-शंभूभक्तांसह समस्त ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या राज्य व केंद्र सरकारने पूर्ण कराव्यात 


       

१) गुजरात मधील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल स्मारकाच्या धर्तीवर छत्रपती संभाजीराजांचे भव्यदिव्य उंच पुतळा उभारून सुमारे ११०  एकरावर शंभुसृष्टी साकारावी. जेणे करून शंभुसृष्टी व स्मारकामुळे ग्रामीण भागाचा विकास होईल असा परिपूर्ण पर्यटन विकास आराखडा अंमलात आणणे.

२) धर्मवीरगडाची ढासळलेली तटबंदी नव्याने बांधने, किल्ल्याच्या आतील बाजूने तटबंदी लगत ट्रॅक रस्ता निर्माण करणे, किल्ल्यातील सर्व मंदिरे व ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी पर्यटकांना सोयीस्कर व्हावे म्हणून अंतर्गत पक्के रस्ते निर्माण करणे. 

३) किल्ल्यातील सर्व लहान मोठ्या रस्त्याच्या दुतर्फा पथ दिवे तसेच मंदिरे व ऐतिहासिक छोट्या मोठ्या वास्तुंसमोर व वास्तूंमध्ये दिवे व माहिती फलक बसविणे.

४)  पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा करणे तसेच स्नान ग्रह व स्वच्छता ग्रह बांधणे.

५) दूर वरून आलेल्या पर्यटकांना मुक्कामी राहण्यासाठी व्यवस्था व्हावी या दृष्टीने भव्य विश्रामगृह बांधणे. तसेच पर्यटकांच्या वाहनांसाठी वाहनतळ पार्किंग व्यवस्था व्हावी. 

६) धर्मवीरगडावर सर्व रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण व्हावे.

७) वृक्ष संवर्धन होण्यासाठी व नवीन लावलेल्या झाडांना वाचविण्यासाठी पाणी देण्याची पक्की, कायम स्वरुपी व्यवस्था करणे .

८) राज्य महामार्गाला पेडगाव गाव म्हणजे धर्मवीरगड किल्ला जोडावा तसेच नदीच्या दुसऱ्या तीरावरील दौड तालुका, जिल्हा पुणे भागातील पर्यटकांना जाणे येणे सोयीचे व्हावे यासाठी नदीवर मोठा  ब्रीज व्हावा. 

९)पेडगावच्या किल्ल्या लगत भौगोलिक दृष्ट्या भीमा -सरस्वती नद्यांचा संगम असल्याने या ठिकाणास धार्मिक दृष्टया महत्त्व आहे. त्यामुळे किल्ल्यातील पाण-दरवाजाच्या बाजूने पंढरपूरच्या धर्तीवर किल्ल्यावरून नदीकडे उतरण्यासाठी व पर्यटक व शिवशंभू भक्तांना पवित्र स्नान करण्यासाठी दगडी घाट बांधणे.

१०) किल्ल्यातील सर्व पुरातन  मंदिरे, ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करून जीर्णोध्दार करावा तसेच तटबंदी व तटबंदीलाअसणाऱ्या सर्व १२ वेशींची डागडुजी करणे तसेच जमीनदोस्त झालेल्या वेशी पुन्हा बांधणे.

११) धर्मवीरगडावरील छत्रपती संभाजीराजांच्या राष्ट्रभक्ती, देशभक्ती चे स्मरण म्हणून "धर्मवीर दिन" दिवसाचे मुख्य कार्यक्रम म्हणून मोठ्या स्वरूपात आयोजन व्हावे. तसेच सर्व राज्यात तो स्मरण दिवस आयोजित व्हावे म्हणून शासनाने तसे परिपत्रक काढावे.

१२) छत्रपती संभाजीराजांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रमुख पंचस्थळांना जोडणारा मोठा रस्ता निर्माण व्हावा व त्यास "छत्रपती संभाजी महाराज पालखी मार्ग" असे नामकरण करावे.

१३) शंभूराजांचे आदर्श प्रेरणादायी पंचस्थळे खालील प्रमाणे आहेत.

#छत्रपती शंभूराजांचे "जन्मस्थळ" किल्ले पुरंदर, तालुका पुरंदर जि.पुणे , -  छत्रपती शंभूराजांचे "युद्धस्थळ" संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी,  - छत्रपती शंभूराजांचे "शौर्यस्थळ" किल्ले पेडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर,  - छत्रपती शंभूराजांचे "बलिदान स्थळ" तुळापूर , तालुका हवेली  -  छत्रपती शंभूराजांचे "समाधी स्थळ"  वढू बुद्रुक, तालुका शिरूर जिल्हा पुणे

१४) पेडगावकडे येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यांवर पेडगाव किल्ल्याकडे (शौर्यस्थळाकडे) उल्लेख असलेले दिशादर्शक मोठे बोर्ड व दिशादर्शक कमानी व्हाव्यात.

१५) पेडगाव किल्ल्यावर कायम स्वरुपी २४ तास सुरक्षा रक्षक,गाईड  नेमावेत. तसेच आवश्यक ठिकाणी सी सी टिव्ही कैमरे बसवावेत, म्हणजे समाजकंटक व किल्ल्याचे नुकसान करणाऱ्यांना वचक बसेल.

१६) पेडगाव किल्ला नदी किनारी असल्याने पर्यटकांना नौकानयन सुरू करावे. तसेच भीमा नदीवर " रिवर रोप वे " करावा जेणेकरून पुणे जिल्ह्यातील पर्यटकांना अहिल्यानगर जिल्ह्यातील धर्मवीरगडावर येण्या-जाण्यासाठी उपयोगाचा होईल. 

१७) किल्ले पेडगाव येथील घडलेला वास्तव इतिहास शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा. 

१८) किल्ल्यातील एका बाजूला मोकळ्या जागेवर युवकांना खेळासाठी कायम स्वरुपी मैदान उपलब्ध करून द्यावे व त्यास सर्व सुविधा निर्माण कराव्यात त्या नियोजित मैदानात "छत्रपती संभाजी महाराज मैदान / पार्क "  असे नामकरण करावे.

१९) किल्ले धर्मवीरगड, पेडगाव येथे खर्डा किल्ल्याच्या धर्तीवर सर्वात उंच भगवा ध्वज स्तंभ उभारावा.

२०) किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांना वाचनालय निर्माण करावे, संबधित वाचनालयास "राजमाता राजाऊ म्हणजेच महाराणी येसूबाई साहेब" असे नाव देऊन त्यात सर्वच थोर युगपुरुषाचे ऐतिहासिक पुस्तके उपलब्ध करावीत. तसेच महाराणी येसुबाई यांचे ही स्मारक व्हावे. 

२१) पेडगाव एस टी स्टॉप ( धर्मवीरगड चौक ) ते पेडगाव किल्ले प्रवेशद्वार या मार्गाला "राजमाता जिजाऊ मार्ग" नामकरण झाले असून तसा अधिकृत बोर्ड लावावा.

२२) महाराष्ट्रातून आलेल्या शिव- शंभुभक्तांना जयंती, पुण्यतिथि, धर्मवीर दिन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी मोठा सुसज्ज सांस्कृतिक सभागृह व्हावे. 

२३) भविष्यात छत्रपती संभाजीराजांच्या शौर्यस्थळावर घडलेला इतिहास व महत्व लक्षात हेलीकॉप्टर व्यवस्थासाठी हेलीपैड करणे. 


🙏लोकप्रतिनिधींसह नेत्यांनी पेडगाव किल्ल्याचा विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा राजकारण करण्याच्या फायद्या करिता निव्वळ खोटी आश्वासन करू नये अशी गडप्रेमी, इतिहास प्रेमी, शिव-शंभुभक्तांसह ग्रामस्थांची कळकळीची विनंती...! 🙏


         #आराखडा #संकल्पना :

श्री. लक्ष्मीकांत राजे शिर्के (इतिहास अभ्यासक व पत्रकार)

    संपर्क - 9623684898

वंशज घराणे -  महाराणी येसुबाई साहेब तथा 

स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे पिलाजीराजे शिर्के 

किल्ले धर्मवीरगड, मौजे पेडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर

Post a Comment

0 Comments