Hot Posts

6/recent/ticker-posts

कृष्णा भास्कर कुलकर्णी वधाच्या पुतळ्यासाठी संभाजी ब्रिगेड हायकोर्टात.

 

• प्रतापगडच्या शिवप्रताप स्मारकासाठी न्यायालयीन लढा देणार-संभाजी ब्रिगेड.

     पिंपरी चिंचवड -   नुकतेच महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी किल्ले प्रतापगड जिल्हा सातारा येथे उभारण्यात येत असलेल्या शिवप्रताप स्मारकाबद्दलची माहिती प्रसारमाध्यमातून दिली आहे या माहितीमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले की प्रतापगडच्या पायथ्याशी दहा कोटी रुपये खर्च करून शिवप्रताप स्मारक उभारण्यात येणार आहे या स्मारकाला घडविण्यासाठी दीपक थोपटे यांच्यासह १५ जणांची टीम गेल्या मागील नऊ महिन्यांपासून कार्यरत आहे.


        प्रतापगड येथे उभारण्यात येणाऱ्या या शिवप्रताप स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचे पोट फाडून त्याचा कोथळा बाहेर काढलेल्या अफजलखान वधाचे शिल्प उभारण्यात येणार आहे.

         या अफजल खान वधाच्या शिल्प उभारणी कार्याबद्दल मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे विशेष अभिनंदन व आभार व्यक्त करतानाच संभाजी ब्रिगेडने या स्मारकांमध्ये अफजलखानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधा वेळीच मारले होते तरी छत्रपती शिवाजी महाराजांवर एकमेव वार करणाऱ्या या स्वराज्य द्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी याला प्रताप गडावर शिवरायांनी तलवारीच्या एकाच फटक्यात जिवे मारलेलं शिल्प सुद्धा शिवप्रताप म्हणून ओळखले जावे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी होती.


        याच मागणीसाठी गेल्या महिन्यात संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा जिल्हाधिकारी सातारा तसेच जिल्हाधिकारी पुणे यांना सविस्तर लेखी निवेदन देऊन मागणी केली होती. 

       तरी त्यांच्याकडे केलेल्या मागणीचा कोणत्याही प्रकारे राज्य सरकार व मंत्री लोढा यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही.


   
यामुळे सतीश काळे यांनी १२ ऑगस्ट २०२४ रोजी अफजल खान वधाच्या पुतळ्यासोबतच कृष्णा भास्कर कुलकर्णी वधाचा पुतळा सुद्धा शिवप्रताप म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याशी बसवावा या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

       याची सुनावणी १९ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई हायकोर्टात होणार आहे.सतीश काळे यांच्या वतीने Adv योगेश पाटील,अब्दुल कादिर,गजानन वानखेडे,तोशिफ शेख,क्रांती सहाने,जगदीश जाधव,उमेश यादव यांच्यासह अनेक वकिलांची टीम हायकोर्टात काम पाहत आहेत.


Post a Comment

0 Comments