संपादकीय
बांग्लादेशात किंवा पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचार झाले तर आपल्या देशातील हिंदुत्ववादी लोकांना खुप वाईट वाटतं. मग त्या देशातील घटनेचा निषेध करण्यासाठी इथे आंदोलने केली जातात.बंद पुकारला जातो.सरकारला धारेवर धरले जाते.टेलिव्हिजन मीडिया,प्रिंट मीडिया व सोशल मीडियावर सुद्धा त्या विषयांवर बातम्यांवर बातम्या चालवल्या जातात. हे सगळं बरोबर आहे. आणि हे प्रत्येकाने केलंच पाहिजे.या सगळ्यातून लोकांमध्ये भावना, संवेदनशीलता,प्रेम,आपुलकी व माणुसकी जिवंत आहे हे दिसून येते.
तर मग आपल्याच देशात आपल्या जवळच्या आपल्या सोबतच्या हिंदूंवर अत्याचार होतो त्यावेळी या हिंदुत्ववादी लोकांना यांच्यामध्ये हिंदू का दिसत नाही.?
आज मराठा समाजाला जगभरात ओळखलं जातं ते शूर वीर व हिंदुत्ववादी म्हणूनच.परंतु गेली कित्येक वर्षे मराठा समाज आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी संविधानिक मार्गाने लढतोय तर त्याला राजसत्तेचा वापर करून बदनाम केलं जातंय लहान लेकरं, आबालवृद्ध यांना अमानुषपणे मारलं जातंय,दररोज कित्येक शेतकरी गळ्यात फास घेऊन मरत आहेत याच आरक्षणासाठी आजपर्यंत कित्येक मराठा बांधवांनी आपले जीवन संपवले कित्येक मुला मुलींचे आयुष्य बरबाद झाले.
परंतु देशातील कोणत्याच हिंदुत्ववाद्यांना मराठा हा सुद्धा हिंदूच आहे आणि त्याच्यावर खुप अन्याय अत्याचार होतोय असं कधी वाटलं नाहि का..?
मराठा समाज हिंदू नाही का मग.?
इतिहासापासून आत्तापर्यंत हिंदुत्वाच्या रक्षणासाठी छातीची ढाल करून पहिल्या रांगेत लढणारा हा मराठाच होता आणि आहे.मराठ्यांविना हिंदुत्वाचं रक्षण कोणीच करू शकणार नाहि.
परंतु सध्या काही गांडुत्ववादी लोकं याच मराठयांना हिंदुत्व शिकवत आहेत.
आपल्या धर्माचं संरक्षण करायला मराठे सक्षम आहेत,
हा इतिहास आहे...
आणि सर्व जाती धर्मातील युवकांना खास करून मराठा समाजातील युवकांना माझी हात जोडून विनंती आहे या बुवाबाजी च्या वक्तव्यावर लक्ष न देता, मनोजदादा जरागें पाटलाचे हात कसे बळकट करता ईकडे लक्ष द्या.
मनोजदादा ची आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे तुम्हाला काही नवहिंदू फुस लावतील बहकावतील विचार करा आणि कुठल्याही अमिषाला बळी पडू नका व स्वतः वर कुठल्याही केसेस करून घेऊ नका, कारण आरक्षण भेटले तर काय फायदा तुमच्या वर केसेस असतील तर वेळीच सावध व्हा व पालकांनी सुद्धा लक्ष ठेवा..
मराठा सेवक राजकुमार भुसारे.
९५२७७६७७७१
0 Comments