पिंपरी चिंचवड दि.०७-: भाजपच्या नवनिर्वाचित खासदार तथा बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतला चंदिगड विमानतळावर काल महिला CISF जवानाने कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी कंगनाच्या कानशिलात लगावली.
या घटनेची बातमी प्रसार माध्यमाद्वारे देशभर पसरली त्या मध्ये एका व्हिडीओत कुलविंदर कौर कंगनाच्या कानशिलात लगावल्याचं मान्य करताना दिसत आहेत. “कंगना राणावतने वक्तव्य केलं होतं की, महिला शंभर - शंभर रुपये घेऊन शेतकरी आंदोलनात बसायला जातात. त्यावेळी माझी आईसुद्धा शेतकरी आंदोलनात जायची” असं महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर समोर आलेल्या नवीन व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.
दरम्यान, कंगना राणावतला कानशीलात लगावणाऱ्या सीआयएसएफ महिला जवानाचं निलंबन करण्यात आलं आहे. शेतकरी आंदोलनावर कंगनाने दिलेल्या प्रतिक्रियेचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचे सुरक्षारक्षक महिलेने मान्य केलं आहे. या सुरक्षारक्षक महिलेचे निलंबन करण्यात आले असून तिथल्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कुलविंदर कौर या पंजाबच्या सुल्तानपूर लोधी येथील रहिवासी आहेत. सध्या त्या मोहाली येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे कुटुंबिय शेतकरी आंदोलनाशी जोडले गेलेले आहे. सध्या कुलविंदर कौर यांची पोस्टिंग चंदिगड आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंटरनल सेक्युरिटीमध्ये होती. यावेळी कौर यांनी कंगनाला थप्पड मारली व आपली प्रतिक्रियादेखील दिली आहे.
या सदर घटनेला संभाजी ब्रिगेडचा महिला जवान कुलविंदर कौर यांना संपूर्णपणे पाठिंबा आहे.
संपूर्ण देशभरातील शेतकरी आज संकटात असताना आपल्या न्याय हक्कासाठी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून विविध प्रकारचे आंदोलने करत असतात. गेल्या दहा वर्षापासून भाजपा सरकार मधील मंत्री नेते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे सोडून त्यांच्या विरोधात विविध अपमानास्पद वक्तव्य करत असतात.
असेच अपमानास्पद वक्तव्यं डिसेंबर २०२० मध्ये कंगना राणावत यांनी तीन कृषी कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू होते यावेळी आपल्या न्याय हक्का साठी कुलविंदर कौर आपल्या आईसह या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
शंभर शंभर रुपये घेऊन शेतकरी आंदोलना बसतात असे वक्तव्य यावेळी कंगनाने केले होते. असे. अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या कंगना राणावत यांचा राग मनात धरून काल चंदीगड विमानतळावर कंगना येताच त्यांच्या कानशिलात लगावली
कुलविंदर कौर या गेल्या पंधरा वर्षापासून एक भारतीय जवान म्हणून आपले कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडत आहेत.संभाजी ब्रिगेड हे देशभरातील शेतकऱ्यांच्या आणि जवानांच्या कायम पाठीशी उभे राहणारे संघटन आहे.
यामुळेच कालच्या या घटनेचे संभाजी ब्रिगेड पूर्णपणे समर्थन करत आहे. आणि नवनियुक्त खासदार कंगना राणावत यांच्या कानशिलात लावणाऱ्या महिला जवान कुलविंदर कौर यांचा भव्य सत्कार करून त्यांना हवी ती मदत सुद्धा करायला संभाजी ब्रिगेड कटिबद्ध आहे.
लवकरच आम्ही कुलविंदर कौर यांचा जाहीर सत्कार करणार असल्याचे प्रसिद्धिपत्रकाद्वारे संभाजी ब्रिगेड कडून कळविण्यात आले आहे. सदर प्रसिद्धी पत्रकावर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते कार्याध्यक्ष वैभव जाधव जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण सचिव रावसाहेब गंगाधरे यांच्या सह्या आहेत.
0 Comments