Hot Posts

6/recent/ticker-posts

शिरगाव फाटा येथे पोत्यात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली.

 

.

        तळेगाव :- तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिरगाव फाट्यावर एका महिलेचा मृतदेह पोत्यात आढळल्याची घटना सोमवारी (दि.२५) उघडकीस आली. या महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र महिलेच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीता शरद गोसावी (४५, रा. लोहगाव, पुणे) असे मृतदेह सापडलेल्या महिलेचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायन्नावार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिरगाव फाट्यावर एका महिलेचा मृतदेह पोत्यात घालून फेकल्याची घटना उघडकीस आली. तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

         महिलेची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. तळेगाव दाभाडे पोलिसांनी महिलेची ओळख पटवली आहे. संबंधित महिला लोहगाव येथील आहे. ती महिला शनिवारी (दि.२३) तिच्या राहत्या घरातून बेपत्ता झाली. याबाबत रविवारी विमानतळ पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

Post a Comment

0 Comments