Hot Posts

6/recent/ticker-posts

अंतरवालीत जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात रविवारी बैठकीचे आयोजन.

 

  

• पिंपरी चिंचवड शहरातून शेकडो मराठा कार्यकर्ते राहणार उपस्थित.

        पिंपरी : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह विविध प्रलंबीत प्रश्न विविध आंदोलने करून सुद्धा पूर्णपणे सुटले नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज आंदोलने करत आहे. सरकारने वेळोवेळी आश्वासने दिली आंदोलने स्थगित करण्यात आली.

         परंतू मराठा समाजाचा सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसी मध्ये समावेश करणे हैदराबाद गॅझेट लागू करणे नवी मुंबईत तत्कालीन मुख्य मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे या मागण्यांसह मराठा समाजाच्या अनेक मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात येत्या २९ ऑगस्ट पासून मुंबईत निर्णायक आंदोलन करण्यात येणार आहे याची तयारी करण्यासाठी अखंड मराठा समाज महाराष्ट्राची  राज्यव्यापी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे सदर बैठक संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दिनांक २९ जून रोजी दुपारी बारा वाजता अंतरवाली सराटी येथे होणार आहे.

       यावेळेस मराठा समाजाचे हजारो प्रमुख कार्यकर्ते  राज्यभरातून उपस्थित राहणार आहेत पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो प्रमुख कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. याचे नियोजन गेल्या दोन आठवड्यांपासून अनेक बैठकांमधून शहरातील कार्यकर्त्यांनी केले आहे अशी माहीती मराठा क्रांती मोर्चाचे सतिश काळे यांनी दिली आहे. अंतरवाली येथे होणाऱ्या राज्यव्यापी बैठकीला पिंपरी चिंचवड शहरातून शेकडो कार्यकर्ते घेऊन जाण्याच्या आयोजन नियोजनासाठी प्रकाश जाधव सतीश काळे नकुल भोईर वसंत पाटील गणेश दहिभाते गणेश देवराम शहाजी कारकर मंगेश चव्हाण अभिषेक म्हसे जेवण बोराडे विशाल मिठे यांच्यासह अनेक कार्यकर्ते अंतरवाली सराटी येथील बैठकीला जाण्याचे नियोजन करत आहेत.

       पिंपरी चिंचवड शहरातील मराठा बांधवांना आवाहन करण्यात येते की हजारोंच्या संख्येने अंतरवाली सराटी येथील बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रकाश जाधव यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments