Hot Posts

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ ) व्यापारी आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून धीरज सकट यांची निवड जाहीर .

 

        पिंपरी चिंचवड ,पुणे-: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार मा रामदासजी आठवले साहेब व,प्रदेश अध्यक्ष मा पोपट शेट घनवट साहेब,प्रदेश सचिव मा सचिन वाघमारे, यांच्या आदेशाने प्रदेश उपाध्यक्ष माणिक पौळ यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा धीरज सकट यांची निवड करण्यात आली. 


        

       तसेच ही निवड डॉ बाबासाहेब आंबेडकर समरक पिपंरी येथे आज दि 25/06/2025 रोजी जाहीर करण्यात आली.

       या वेळी उपस्थित रिपाई मातंग आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष मा संतोष भाऊ काची, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मा बाबासाहेब पाटोळे या वेळी उपस्थित होते.

       

     मातंग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष काची साहेबांनी शुभेच्छा दिल्या व नवनिर्वाचित पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. धीरज भाऊ सकट यांनी रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष मा रामदास आठवले साहेबांचे, प्रदेश अध्यक्ष पोपट शेट घनवट, व प्रदेश सचिव सचिन वागमारे, प्रदेश उपाध्यक्ष मा माणिक पौळ साहेबांचे आभार मानले.



Post a Comment

0 Comments