Hot Posts

6/recent/ticker-posts

मॅफेड्रॉन (एम.डी.) १४,६०,००० /- रु. किं.चा व देशी बनावटीचे पिस्तल राऊन्डसह दोन संशयित इसमांकडुन जप्त फरासखाना भागात कारवाई

 


गुन्हे शाखेची अंतर्गत कारवाई

       पुणे :मा.पोलीस आयुक्त यांनी पुणे शहरातील अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिले असून त्या अनुषंगाने दि.२९/११/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक श्री विजय कुंभार, पोलीस निरीक्षक श्री.सुदर्शन गायकवाड व सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक तसेच अधिनस्त पोलीस अधिकारी व

पोलीस अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना डायमंड बिल्डींगचे खाली मारुती मंदिराजवळ शुक्रवार पेठ, पुणे येथे सार्वजनिक ठिकाणी इसम नामे १)बॉबी भागवत सुरवसे, वय २८ वर्षे, रा. गजराज हेल्थ क्लबजवळ, सर्वे नं. १२, लक्ष्मीनगर येरवडा, पुणे. २) तोसिम ऊर्फ लड्डु रहिम खान, वय ३२ वर्षे, रा. १२८२ दर्गारोड, कसबा पेठ, पुणे यांच्या ताब्यातुन एकुण १६,५७,०००/- रु. किंमतीचा ऐवज त्यामध्ये एकुण

        १४,६०,०००/- रु.कि.चा ७३ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) असा अंमली पदार्थ व ६७,०००/- रु.कि.चे एक देशी बनावटीचे लोखंडी स्टील बॉडी असलेले पिस्टल, एक मॅगजीन व दोन जिवंत काडतुसे, व इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द फरासखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २५२/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), २९, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि नितीनकुमार नाईक, अं.प.वि.प.२, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत. सदरची नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त,पुणे श्री.रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे श्री. शैलेश बलकवडे,

        मा. पोलीस उप-आयुक्त,गुन्हे,पुणे श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २, तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार, पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक

       नितीनकुमार नाईक, सपोफौ सुनिल पवार, पोलीस अंमलदार साहिल शेख, उदय राक्षे, सुरेंद्र जगदाळे, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, अझिम शेख, आझाद पाटील, अझिम शेख, अमोल राऊत, पवन भोसले,

निलम पाटील, यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments