Hot Posts

6/recent/ticker-posts

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहतुक शाखेकडुन टोईंग व्हॅन व्दारे कारवाई चालु केलेबाबत....

 

        पिंपरी चिंचवड प्रतिनिधी -: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव हि औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी, तळवडे, ही आयटी पार्क क्षेत्रे असुन देहु व आळंदी हि संतांची भुमी असुन पिंपरी चिंचवड

      आयुक्तालयांतर्गत मोठमोठ्या बाजारपेठा तसेच शैक्षणीक व व्यापारी संकुले असुन नामांकित अशी हॉस्पीटल्स आहेत. वरील सर्व बाबींचा विचार करता पिंपरी चिंचवड आयुक्तालयातर्गत दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच

      वापर करणाया नागरीकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून नागरीक आपली दैनंदिन कामे करणेकरीता त्यांचे दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करत असतात. पिंपरी चिंचवड शहरात नागरीक ठिकठिकाणी आपले दुचाकी तसेच चारचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे तसेच बेकायदेशीरपणे दिसेल त्या ठिकाणी पार्क करत असल्याने वाहतुक कोंडीत दिवसेंदिवस

       वाढ होत असून वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत टोईंग व्हॅन प्रकल्प कार्यन्वित करण्यात आलेली असून बेकायदेशीर व वाहतुकीस अडथळा होईल अशी पार्किंग करण्यात आलेली वाहने दंड आकारुन टोईंग करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर कारवाहीसाठी एकुण २५ वाहने वापरण्यात येणार असून पहिल्या टप्प्यामध्ये एकुण ०८ वाहने वापरण्यात येत असून

       टप्प्याटप्प्याने व आवश्यकतेनुसार वाहनांची संख्या वाढवण्यात येत आहे.दुचाकी वाहन टोईंग केल्यास सदर वाहनांस ५०० रु दंड व २०० रु टोईंग चार्ज आकारण्यात  येणार असून ३६ रुपये जी. एस. टी असा एकुण ७३६/- रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच चारचाकी  वाहनांकरीता ५०० रुपये दंड व ४०० रुपये टोईंग चार्ज आकारण्यात येणार असून ७२ रुपये जी.एस.टी असा एकुण ९७२/- रुपये एवढा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच टोईंग कारवाई केलेल्या वाहनांवर पुर्वीचे चालान प्रलंबित असेल तर प्रलंबित चालानपैकी किमान एक चालान हे टोईंग वेळच्या चालानसोबत भरणे बंधनकारक आहे.

       तरी नागरीकांनी आपली वाहने बेकायदेशीरपणे व वाहतुकीस अडथळा होईल याप्रमाणे न लावता योग्य रीतीने लावणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments