पिंपरी (मोरवाडी)दि.27/04-: मोरवाडी पिंपरी या ठिकाणी जुना मुंबई हायवे वरती एक टँकर अपघातग्रस्त झाला असता त्या टँकरचा ड्रायव्हर हा केबिनमध्ये अडकल्याची माहिती अग्निशामन दलाला पोलीस हवालदार श्री खाडे यांनी माहिती दिली असता लगेच अग्निशामन दलाच्या जवानांनी तिकडे धाव घेतली आणि सदर इसमाचे प्राण वाचवले.
वर्दी देणाऱ्याचे नाव :- श्री खाडे (पोलीस हवलदार),मो. न.:- 8888770777.
वर्दीची वेळ :- 02:35 AM
घटनास्थळाचा पत्ता:- सिटी वन मॉल मोरवाडी चौक जुना मुंबई पुणे हायवे पिंपरी.
वर्दीवर हजर अग्निशमन केंद्र :- पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र, प्राधिकरण उप अग्निशमन केंद्र.
सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता MH43 CE 0784 या टँकरचा अपघात होऊन वाहन चालक श्री अंकुश मस्के वय वर्ष 46 हे केबिन व स्टेरिंग मध्ये अडकल्याचे निदर्शनास आले जवानांनी त्वरित सर्कुलर सॉं, स्प्रेडर, क्रोबार, रोप ,रेस्क्यू बेल्ट , इत्यादीच्या साह्याने सदर इसमाची सुखरूप सुटका करून रुग्णवाहिकेच्या मदतीने वायसीएम हॉस्पिटल कडे रवाना केले तसेच रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवर माती टाकून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात आला. सदर वर्दी वरती कोणतीही जीवित हानी नाही.सदर ठिकाणी श्री विकास नाईक(लि फा), श्री प्रतीक कांबळे, श्री अमोल चिपळूणकर , श्री अर्जुन जाधव श्री अभिषेक भांगे ,श्री कुटे , श्री कंठाळे आणि इतर कर्मचारी वर्दीवर कार्यरत होते.
0 Comments