वाकड दिनांक २५/०५/२०२४-: ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र 25 मौजे वाकड येथील भुजबळ चौक मधुबन हॉटेल शेजारी रस्त्यालगत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील असलेले अनधिकृत रूफटॉप स्पाइस फॅक्टरी,अब्सोल्यूट बार्बेक्यू व ९ व्या मजल्यावरील पब्लिक हॉटेल येथे आज दिनांक 25/05/2024 रोजी ड क्षेत्रीय कार्यालयामार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात आली सदर कारवाई मध्ये एकूण अंदाजे 9000 चौ फुट क्षेत्रफळाचे अनधिकृत रूप स्टॉप पाडण्यात आले आहेत.
सदर कारवाई मा. आयुक्त सो. यांच्या आदेशानुसार व मा. उपायुक्त श्री लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'ड '
प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी डॉ. अंकुश जाधव यांच्या अधिपत्याखाली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भागवानी,उप अभियंता विजय भोजने,कनिष्ठ अभियंता, अमोल पडलवार बिट निरीक्षक सुहास भगत,ओंकार ताटे देशमुख, शेषराव अटकुरे कनिष्ठ अभियंता ड क्षेत्रीय अतिक्रमण पथकप्रमुख अमोल शिंदे,
एम.एस. एफ जवान- १३
पोलीस उपनिरीक्षक श्री अँथोनी, पोलीस -४,
मजूर -30,
गॅस कटर -२
मनपा कर्मचारी व मजूर १५यांचे उपस्थितीत करण्यात आली. सदरची कारवाई उद्या चालू राहणार आहे.
. ( डॉ.अंकुश जाधव)
. क्षेत्रीय अधिकारी
. ड क्षेत्रीय कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका
. रहाटणी- १७
0 Comments