Hot Posts

6/recent/ticker-posts

महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे वतीने,सेक्टर २३ निगडी साठी जाहीर निवेदन.....

 

        


         पिंपरी चिंचवड, दि.२७-; पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडील पाणीपुरवठा विभागाच्या से.क्र. २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे व शहरातील वितरण व्यवस्थेमधील विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरुवार दि.३०/०५/२०२४ रोजी पिंपरी चिंचवड शहराचा सकाळचा पाणीपुरवठा नियमीत वेळेनुसार होणार असुन संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

        दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवलेमुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि. ३१/०५/२०२३ रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होईल.

        तरी नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून मनपास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

मुख्य अभियंता-१पाणीपुरवठा विभाग

पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

पिंपरी- १८.



Post a Comment

0 Comments