Hot Posts

6/recent/ticker-posts

आरक्षणा पलीकडचे शाहू महाराज समजून घ्या -सतिश काळे.

 

शाहू महाराजांची जयंती संभाजी ब्रिगेडच्या वतीने उत्साहात साजरी.

          पिंपरी चिंचवड दि.२७-: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती संभाजी ब्रिगेडच्या वतीने शाहूनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षी राजर्षी शाहू महाराजांची 150 वी जयंती होती. त्यानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. शाहूनगर केएसबी चौक चिंचवड येथील राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष वैभव जाधव यांच्या हस्ते शाहूंच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

       तसेच 150 व्या जयंतीनिमित्त उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी छत्रपती शाहूंच्या जयघोषाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.


       या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करताना छत्रपती शाहूंच्या आठवणींना उजाळा दिला.

        शाहू महाराजांचे सामाजिक शैक्षणिक तसेच समाजसुधारणेच्या कार्याचा ऐतिहासिक ठेवा आज महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोहचला पाहिजे असे मत व्यक्त केले आणि 


        'आरक्षणाचे जनक' या एकाच विशेषणाखाली दडलेले शाहू महाराजांचे आभाळाएवढे कर्तृत्व जनतेसमोर येणे गरजेचे आहे. महाराजांची ओळख ही केवळ 'आरक्षणाचे जनक' इतकीच मर्यादित नाही. लोककल्याणाच्या हजारो निर्णयांपैकी महाराजांचा तो एक निर्णय होता, हे देखील लक्षात घेतले पाहिजे. या व्यतिरिक्त ही महाराजांच्या अशा अनेक लोककल्याणकारी कामांचा अभ्यास झाला पाहिजे. 

       महाराजांनी आपल्या राज्यात राबविलेली सिंचन योजना, दुष्काळ निवारण यंत्रणा,शिक्षण व्यवस्था,आरोग्य व्यवस्था, सहकार चळवळ, उद्योगविकासाचे आराखडे, वनसंरक्षणाचे कायदे या व अशा इतर अनेक बाबी या आजही तितक्याच उपयुक्त व परिणामकारक ठरणाऱ्या आहेत.

        महाराजांचं कर्तृत्व किती सांगावं जितकं सांगावं तितकं थोडकंच आहे. असे मनोगत काळे यांनी व्यक्त केले. या वेळी सचिव रावसाहेब गंगाधरे शहर कार्याध्यक्ष विजय पाटील उपाध्यक्ष एकनाथ जगताप संघटक नंदकिशोर यादव सहसचिव किशोर पवार,दिलीप कदम,उमेश पाटील,समाधान लांडगे,रविंद्र कदम,पराग जाधव सामाजिक कार्यकर्ते राजन नायर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments