पुणे दि. 25/07/2024-: खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा *सकाळी 6:00वा. 35574 क्यूसेक्स* करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरात 100 mm व घाटमाथ्यावर 200 mm पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे.
आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
शहरातील पुढील ठिकाणी त्वरित दक्षता घेण्यात यावी. संबंधित ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा.
🔴भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे .
🔴गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर .
🔴शितळा देवी मंदिर डेक्कन.
🔴संगम पूल पुलासमोरील वस्ती
🔴कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घ्यावी.
🔴होळकर पूल परिसर
पुणे महानगरपालिका प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती खबरदारी त्वरित घ्यावी.*
कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे.
0 Comments