नाशिक दि.२४/०७ (प्रतिनिधी)-: असं म्हणतात की..तहानलेल्या पाणी द्यावे, भुकेलेल्या अन्न द्यावे, गोरगरीब दिन दुबळ्याना, अबालवृद्धांना सहाय्य करावे, मंदिरात जाऊन लाखो रुपयांचे दान करण्यापेक्षा अशा गोरगरीब लोकांना मदत करावी यासारखे पुण्य कुठेही नाही. आणि यासारखे सामाजिक कार्य दुसरे नाही.
आणि असाच सामाजिक कार्याचा वसा आपल्या हाती घेऊन, अतिशय निस्वार्थ आणि प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करणाऱ्या "नमस्ते नाशिक फाउंडेशन" च्या अध्यक्षा डॉ. स्नेहल देव यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिलेले आहे.
"जिथे कमी तिथे आम्ही" या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन ही संस्था नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवत असते . असाच एक उपक्रम महावीर इंटरनॅशनल चे अनिल नाहर यांच्या सहयोगाने **एक हात मदतीचा** ह्या उपक्रमांतर्गत राबविण्यात आला. आजचा दिवस हा कायम आठवणीत राहील . आज आम्ही शिरसाळे येथून नासिक कडे येत असताना वाडीवरे गावा जवळ एक गरजू वयस्कर आजी भर पावसामध्ये भिजत भाजी विकत असताना संस्थेच्या अध्यक्ष स्नेहल देव यांच्या नजरेत पडल्या , त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी बाजूला लावून त्या आजींना व्यवसायिक उपयुक्त अशी व्यवसायिक छत्री भेट म्हणून दिली . त्या आजींना मिळालेली लाख मोलाची भेट ही त्यांच्या नजरेतुन दिसत होती व त्यांना झालेला आनंद हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता .हाच आशीर्वाद समजून आम्ही त्या आईचे धन्यवाद मानले व त्यांना ही भेट देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.
0 Comments