पिंपरी चिंचवड दि.२७/०९/२०२४-: जिजाऊ ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणीची बैठक भोसरी येथे गुरुवार दि.२६ रोजी आयोजित करण्यात आली होती.यावेळी शिवमती प्रमिला वाबळे यांची जिजाऊ ब्रिगेडच्या भोसरी विभाग अध्यक्ष पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.
जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा सुलभा यादव यांनी नियुक्तीपत्र देऊन प्रमिला वाबळे यांचा सत्कार केला.यावेळी जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्षा अश्विनी पाटील,शहर कार्याध्यक्षा रेखा गुळवे,शहर उपाध्यक्षा कौशल्या जाधव,मार्गदर्शिका रत्नप्रभा सातपुते या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होत्या.
जिजाऊ ब्रिगेड ही वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारी,अंधश्रद्धा निर्मूलन करणारी संघटना असून संघटनेच्या देशातील सर्व राज्यात मोठ्या प्रमाणात शाखा कार्यरत आहेत असे प्रतिपादन शहराध्यक्षा सुलभा यादव यांनी यावेळी केले.भोसरी विभागातील जास्तीत जास्त महिलांना सभासद करून महिलांचे प्रबोधन करणार असल्याचे निवडीबद्दल मनोगत व्यक्त करताना प्रमिला वाबळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरवात जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदना म्हणून करण्यात आली.सदर बैठकिचे आयोजन रेखा गुळवे,मंगल चौधरी,ललिता मगर,राणी आवटी,स्वाती साळवी,स्वाती पाटील,अनघा शिंदे यांनी केले होते.आभार रेखा गुळवे यांनी मानले तर सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले.
0 Comments