Hot Posts

6/recent/ticker-posts

हिंदुराष्ट्र सेना या राष्ट्रीय संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटक पदी युवानेते पंकज पवार यांची निवड.

• पंकज पवार यांचे मागील सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील काम पाहता तसेच त्यांचा असलेला प्रचंड जनसंपर्क पाहता हिंदू राष्ट्र सेनेची त्यांच्यावर मोठी जिम्मेदारी.

      पिंपरी चिंचवड दि.०७/१०/२०२४-: पिंपरी चिंचवड मधील मोशी प्राधिकरण परिसरातील प्रसिद्ध सामाजिक धार्मिक कार्यकर्ते आणि संघर्ष संस्था प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच, हिंदूत्ववादी आमदार महेशदादा लांडगे यांचे कट्टर समर्थक पंकज शिवाजी पवार यांची  हिंदुराष्ट्र सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटक पदी निवड झाली आहे. 

      पंकज पवार हे मोशी प्राधिकरणातील स्वामी समर्थ मंदिरांचे संस्थापक म्हणून सर्वाना परीचित आहे. तसेच पंकज पवार हे आपल्या संघर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून एका वर्षामध्ये येणारे सर्व सण उत्सव जसे की श्री स्वामी समर्थ प्रगट दिन, गोपाळकाला, दहीहंडी, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव त्याचबरोबर  महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी आणि इतर अशा भरपूर सामाजिक उपक्रम चे आयोजन करून ते मोठ्या उल्हासामध्ये साजरे करत असतात . 

       म्हणून की काय त्यांच्या पाठीमागे परिसरातील प्रचंड जनसमुदाय केव्हाही आणि कधीही उभा असतो. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर नगरसेवक इत्यादी सदैव त्यांच्या पाठीशी उभे असतात. आणि याच त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील कार्य यामुळे  एक तरुण, तडफदार आणि युवा नेता म्हणून त्यांच्यावर हिंदू राष्ट्र सेनेने प्रचंड अशी मोठी जिम्मेदारी त्यांच्यावर सोपवली आहे. 

      हिंदू राष्ट्रीय सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, "हिंदुतेज सूर्य" श्री धनंजयभाई देसाई यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहर संघटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते पंकज शिवाजी पवार यांची निवड करण्यात आली तसेच त्यांना तसे नियुक्तिपत्रही देण्यात आले.


      याप्रसंगी संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनेक हिंदू राष्ट्र सेनेचे शेकडो पदाधिकारी व हिंदू राष्ट्रवीर उपस्थित होते भविष्य काळामध्ये हिंदू साठी व हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याचं प्रयत्न युवा नेते पंकज पवार यांनी करावा व ते करतील अशी अपेक्षा देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

      पंकज पवार यांच्या माध्यमातून  वर्षभर अनेक धार्मिक सण व कार्यक्रम साजरे केले जातात. यामुळे परिसरातून त्यांच्या निवडीचे लहान थोर अबाल वृद्ध तसेच महिला वर्गांमधूनही प्रचंड प्रमाणामध्ये स्वागत करण्यात येत आहे.



Post a Comment

0 Comments