Hot Posts

6/recent/ticker-posts

बोरघाटात बस २० फूट खड्ड्यात कोसळली...

 

      लोणावळा :- खंडाळा येथील बोरघाटात आज (गुरुवारी) पहाटे झालेल्या भीषण अपघातात टेम्पोची धडक बसून एक प्रवासी बस बाजूच्या २० फूट खोल खड्ड्यात पडली. सुदैवाने बसमधील सर्व ११ प्रवासी सुखरूप बचावले. टेम्पोतील तिघेजण गंभीर जखमी झाले.

      पहाटे तीनच्या सुमारास सांगोला ते मुंबई प्रवासी बस (क्र. MH-03-CV-5853) व कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो (क्र. MH-14-HU-1069) यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात बोरघटात किलोमीटर ३५ जवळ झाला. टेम्पोचा ब्रेक फेल होऊन तो बसच्या मागील बाजूस धडकला. त्यामुळे बस रस्ता सोडून सुमारे २० फूट खोल खड्ड्यात कोसळली.

       बसमध्ये प्रवास करणाऱ्या ११ प्रवासी आणि चालक सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे. आयआरबी देवदूत पथक, खोपोलीचे अपघात पथक, एचएसपी आणि खोपोली पोलीस स्टेशनच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याने त्यांच्यावर खोपोली नगरपालिका रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले व नंतर त्यांना सोडण्यात आले.

       दुसऱ्या बाजूला, कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील तीन गंभीर जखमींना कळंबोली येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशन हद्दीत झाला असून अधिक तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments