Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री कोण होणार? सस्पेंस कायम असताना एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा..

 

         मुंबई :- राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? हा सस्पेंस कायम असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस झाले असून अजूनही मुख्यमंत्रीपदाचा निर्णय महायुतीत झाला नसल्याची चर्चा होती. पण आज पत्रकार परिषद घेत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

         एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्हाला वाटत असेल कुठे घोडं अडलं. मी मोकळा माणूस आहे. मी धरून ठेवणं, ताणून ठेवणं असा माणूस नाही. मला लाडका भाऊ हे पद मिळालं. ही माझी मोठी ओळख तयारी झाली आहे. काल मी नरेंद्र मोदींना फोन केला होता. मी त्यांना सांगितलं सरकार बनवताना निर्णय घेताना कुठलं काही अडचणीचं आहे, माझ्यामुळे किंवा कुणामुळे असं मनात आणू नका. तुम्ही मदत केली. अडीच वर्ष संधी दिली. तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल.

         एकनाथ शिंदे म्हणाले की, एनडीए आणि महायुतीचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी घेतलेला निर्णय भाजपला अंतिम असेल तसा आम्हालाही अंतिम असेल. निर्णय घेताना माझी अडचण आहे का असं वाटू देऊ नका. एकनाथ शिंदे काही अडचण आहे का असं वाटू देऊ नका. सरकार बनवताना माझा अडसर ठेवू नका. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. मला मान्य असेल. मी मोदी आणि शाह यांना फोनवर सांगितलं.

        जीवन में असली उडान बाकी है.. अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन.. अभी तो सारा असमान बाकी है..! असं देखील शिंदे म्हणाले. अजून खूप काम करायचं आहे. राज्याला विकासाकडे न्यायचं आहे. मोदींनी देशाचं नाव जगभर रोशन केलं. आज देश आत्मनिर्भर झाला आहे. आत्म सन्मान झाला आहे. आपले रिलेशन इतर देशांसोबत डेव्हलप झाले आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल. त्यामुळे कोणती कोंडी काही राहू नये हे सांगण्यासाठी बोलावलं आहे. त्यामुळे वरिष्ठ जे निर्णय घेतील, तो मान्य असेल.

       भाजपला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. आमची बैठक होणार आहे. भाजपची बैठक होणार आहे. त्यात ते निर्णय घेतील. कोंडी, अडसर, नाराजी नाही आहे. स्पीड ब्रेकर नाही. नाराजी नाही. जो निर्णय भाजपचे दिल्लीतील नेते घेतील त्याला आमच्या शिवसेनेचा पाठिंबा असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments