Hot Posts

6/recent/ticker-posts

चिखलीतील कृष्णानगर भाजी मंडई चौकात गाड्यांवर पेट्रोल टाकून पेटविल्या…

 

        पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२४) :- “आम्हांला दारु पिण्यासाठी २,००० रुपये दे. तु आंम्हाला दारु पिण्यासाठी पैसे देत नाही का? तुला दाखवतो.” अशी धमकी देत तक्रारदाराच्या शर्टाच्या खिश्यातील ५०० रुपये काढुन घेतले.

       तसेच तक्रारदाराच्या चुलत भावाची अॅक्टीवा व पॅशन गाडीवर पेट्रोल टाकुन त्या लायटरने पेटवुन  दिल्या. आणखी एका महिलेची सॅन्ट्रो झेन कार, दुसऱ्याची वॅगनर कार या वाहनांची आणि इतर लोकांच्या वाहनांची मोडतोड करुन नुकसान केले आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.

      हि घटना (दि.१७) रोजी रात्री १०.१५ वा. चे सुमारास ओमसाई मार्केट, स्पाईन रोड, कृष्णानगर भाजी मंडई चौक, चिखली येथील महादेव हॉटेलचे पाठीमागे घडला. याप्रकरणी मगन करतारामजी देवासी यांनी आरोपी दोन विधीसंघर्षित बालक यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.

      चिखली पोलिसांनी ७२०/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४),३२६ (फ), ११५(२), ३५२,३५१(२), ३(०५) प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि बाबरपुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments