पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई.
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :- मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे साहेब यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे परिसात दुचाकी व चारचाकी वाहन चोरीस आळा घालण्यासाठी विशेष मोहिम राबवून गुन्हेगारांची माहीती मिळवून कायदेशीर कारवाई करणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले आहे. गुन्हे शाखा युनिट १ चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार असे पिंपरी
चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस अभिलेखा वरील गुन्हेगारांची माहीती घेवून कार्यवाही करीता
असतांना दि.२५/१२/२०२४ रोजी गोपनिय बातमीदाराकडून बातमी मिळाली कि, वाहन चोरी गुन्हयातील पोलीस
अभिलेखा वरील गुन्हेगार नामे रफिक उमर जमादार, वय ३७ वर्षे, रा. तुपेवस्ती, टोल नाक्याजवळ, मोशी, पुणे हा
चोरीच्या गुन्हयातील सोन्याचे दागिने विक्री करीता राम मैदान, जाधववाडी, चिखली, पुणे येथे थांबला असून
त्याचे कडील विना नंबरची मेस्ट्रो दुचाकीगाडी ही चोरीची आहे अशी खात्रीशीर बातमीच्या अनुषंगाने खालील
प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे..
गुन्हे शाखा पोलीस उप आयुक्त संदिप डोईफोडे व सहा. पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांना
याबाबतची माहीती कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ थे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस
निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी गुन्हे शाखा युनिट १ चे श्रेणी पोलीस उप निरीक्षक शिवाजी कानडे व स्टाफ
यांचे पथक तयार करुन पोलीस स्टाफ व पंच असे राम मैदान, जाधववाडी, चिखली, पुणे येथे जावुन सापळा
लावुन थांबलो असता बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाचा एक इसम बिना नंबरची दुचाकी मोटार सायकलवर
संशयित रित्या थांबलेले दिसले असता यूनिट १ चे स्टाफने सदर इसमास शिफारतीने पकडले. त्याचे नाव रफिक
उमर जमादार, वय ३७ वर्षे, रा. तुपेवस्ती, टोल नाक्या जवळ, मोशी, पुणे असे असुन यांचेकडील दुचाकी मोटार
सायकलचे डिक्कीत एकाप्लॅस्टीकच्या पिशवीत बाचून ठेवलेल्या, एक सोन्याचे ब्रेसलेट, एक गळ्यातील सोन्याचे
चैन गणपतीचे पेंडलसह असा एकुण ५,३१,०००/- रुपये किंमतीचा सोन्याचे दागिणे असा मुद्देमाल जप्त करण्यात
आला आहे. सदरबाबत वाकड पो.स्टे गु.र.न ८९८ / २०२४ भारतीय न्याय संहिता ३०६, १२३ प्रमाणे गुन्हा
असुन तो उघडकीस करण्यात आला आहे.
नमुद आरोपीचे ताब्यातील विना नंबरची मेस्ट्रो दुचाकीगाडी ही चोरीची असून आरोपी रफिक उमर
जमादार याने त्याचे साथीदारा नामे १) निलेश मनोहर गायकवाड २) ईश्वर संजय पवार यांचेसह त्यांनी पिंपरी
चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतुन वेगवेगळ्या ठिकाणावरुन दुचाकी वाहने चोरी केली असल्याचे उपड
झाल्याने नमुद आरोपी नामे १) निलेश मनोहर गायकवाड वय ३० वर्षे, रा.गुरुकृपा हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती,
चिखली, पुणे, २) ईश्वर संजय पवार, वय २४ वर्षे, रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली, पुणे यांना ताब्यात
घेवून त्यांच्याकडून पुढिल दुचाकी वाहने मेस्ट्रो, रॉयल इनफिल्ड, हिरो स्प्लेंडर, हिरोहोंडा पॅशन प्रो अशी ०४
दुचाकी वाहने असा ३,२०,०००/- रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करून खालील प्रमाणे दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे
उघड केले आहेत.
१) चिखली पोलीस ठाणे, गुरजि.नं.७५७/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२)
२) पिंपरी पो.स्टे गु.र.नं ११०४/२०२४ भारतीय न्याय संहिता ३०३ (२),
३) पिंपरी पो.स्टे. गु. रजि. नं. ११५२/ २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)
४) महाळुंगे एम.आय.डी.सी पो.स्टे. गु. रजि. नं.८६२/२०२४ भारतीय न्याय संहिता क. ३०३(२)
आरोपी १) रफिक उमर जमादार, वय ३७ वर्षे, रा. तुपेवस्ती, टोल नाक्या जवळ, मोशी, पुणे यांचे
विरुध्द पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत वाहन चोरीचे एकूण ०७ गुन्हे नोंद असून २) निलेश
मनोहर गायकवाड, वय ३० वर्षे, रा.गुरुकृपा हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली, पुणे यांचे विरुध्द पिंपरी
चिंचवड व पुणे शहर पोलीस आयुक्ताल तसेच पुणे ग्रामीण हद्दीत वाहन चोरी, घरफोडी, जबरीचोरी, दरोडयाची
तयारी असे एकूण ३४ गुन्हे नोंद आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री
शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री संदिप डोईफोडे,
सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री बाळासाहेब कोपनर यांचे
मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ थे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, श्रेणी
पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अमलदार मनोजकुमार कमले, महादेव जावळे, गणेश
महाडीक,सचिन मोरे,प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, श्रीधन इचके, प्रमोद गर्जे, तुषार वराडे, अजित रूपनवर,
तानाजी पानसरे यांनी केली आहे.
0 Comments