Hot Posts

6/recent/ticker-posts

शेअर मार्केटच्या नावाखाली ३३ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घालणा-या आरोपीस गुन्हा दाखल

 

होताच काही तासातच पोलीसांनी सापळा लावुन केले जेरबंद

फिर्यादी नामे- अवधुत विनायक केदार वय ४६ वर्षे धंदा - नोकरी रा. साई कृपा नगर खंडोबानगर

`आखेगाव रोड शेवगाव ता.शेवगाव जि. अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन गुरुकृपा ट्रेडिंग इनव्हेस्ट शेअर

मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली एकुण ३३ लाख ५० हजार रुपये फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन

करुन फसवणुक झाल्याचे फिर्यादीत नमुद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस

स्टेशन गु.र.नं- ९९६ / २०२४ भादवि कलम ४२०, ४०६ सह एमपीआयडी ३,४ प्रमाणे दिनांक-

१५/१२/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यातील आरोपी नामे- १) सखाराम नामदेव ढोरकुले वय २७ रा. बाभुळगाव ता.शेवगाव

२) फ्रांन्सीस सुधाकर मगर वय ५० रा. आखेगाव रोड शेवगाव ता. शेवगाव वरील दोन्ही आरोपी यांचे

विरुध्द गुन्हा दाखल होताच पळुन जाण्याचे तयारीत असतांना मा. पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव

पोलीस स्टेशन यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवुन पोलीस पथक तयार करुन आरोपी क्र. १ याला शेवगाव-

पैठण रोडने जात असतांना मो.सा. वर पाठलाग करुन पकडण्यात आले आहे तसेच आरोपी क्र. २ याला

आखेगाव रोड शेवगाव येथुन ताब्यात घेवुन त्यांना शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन नमुद गुन्ह्यात अटक

" करण्यात आली असुन त्यांना मा. जिल्हा सत्र न्यायालय अहिल्यानगर येथे हजर केले असता त्यांना ८ दिवस

पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

-वरिल आरोपी विरुध्द इतर कोणीही व्यथीत अगर बळीत अशा जनतेची फसवणुक झाली असल्यास

त्यांनी शेवगाव पोस्टेला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे याव्दारे आवाहन करण्यात येत आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो अहिल्यानगर, मा. अपर पोलीस

अधिक्षक श्री. प्रशांत खैरे अहिल्यानगर, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री सुनिल पाटील सो उपविभाग

शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री समाधान नागरे, पोसई प्रविण महाले, पोहेकाँ चंद्रकांत कुसारे, पोकाँ

शाम गुंजाळ, पोकॉ संतोष वाघ, पोकाँ राहुल खेडकर, पोक फलके, पोकाँ धनेश्वर पालवे, पोकों प्रशांत आंधळे,पोकॉ देविदास तांदळे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोकाँ राहुल गुंडु यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास पोसई प्रविण महाले हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments