पुणे प्रतिनिधी : दि.१७/१२/२०२४ रोजी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार हरीष मोरे, व विशाल गाडे, यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आठ दहा दिवसापुर्वी कल्याणीनगर पुणे येथील घरफोडी करणारा आरोपी हा सौरभ साबळे हा गाडीतळ हडपसर पुणे येथे गाडीतळ हडपसर पुणे येथील लोकसेवा किचन जवळील, सार्वजनिक बस स्टॉप लगत काळया रंगाच्या होंडा अॅक्टीवासह कोणाची तरी वाट पाहात थांबलेला आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अजय वाघमारे यांना कळविली असता, त्यांनी बातमी प्रमाणे सदर ठिकाणी जाऊन खात्री करुन मिळुन आल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे युनिट- ४ चे पथक बातमीचे ठिकाणी जावुन बातमीतील वर्णनाचा इसमाचा शोध घेता तो मिळून आला. त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता, त्याने त्याचे नाव सौरभ शिवाजी साबळे वय २६ वर्षे रा. वैष्णवी सिटी, देवाची उरुळी, आदर्शनगर हडपसर पुणे असे असल्याचे सांगितले.
त्याचे ताब्यात एक काळया रंगाची अॅक्टीवाच्या गाडीच्या डिक्कीमध्ये रोख रक्कम १,८०,०००/- रु. व एक मोबाईल हॅन्डसेट मिळुन आले. त्याचे ताब्यात मिळालेल्या मुद्देमालाबाबत त्याचेकडे तपास करता त्याने त्याचे ताब्यातील अॅक्टीवावरून १० ते १२ दिवसापुर्वी कल्याणीनगर पुणे येथील एका हॉटेलच्या मागच्या दरवाजा उचकटुन आतमध्ये घुसून हॉटेलचे कॅश काऊंटर, रॉडने तोडुन त्यातील रोख रक्कम चोरी केली होती. सदर रक्कम त्याच्या अॅक्टीवा गाडी डिक्की मध्ये ठेवली व काही रक्कम मौजे करीता खर्च केली असल्याचे सांगितले.
त्याबाबत येरवडा पोलीस ठाणे येथे संपर्क साधुन माहीती घेतली, सदर बाबत येरवडा पोलीस ठाणे गु.र.नं.८२१/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३४ प्रमाणे गुन्हे उघडकीस आहे तसेच आरोपीच्या ताब्यात १) ७०,०००/- रु. कि. एक अक्टीवा मोटार सा. २) १,८०,००० /- रोख रक्कम ३) १५,०००/- एक मोबाईल हॅन्डसेट असा एकुण २,६५,०००/- रु. कि.रू चा मुदेमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाई करीता येरवडा पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास येरवडा पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे - २ श्री. राजेंद्र मुळीक युनिट - ४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, यांचे मार्गदर्शनात युनिट ४ कडील पोलीस उप-निरीक्षक, वैभव मगदुम, दिगंबर चव्हाण,पोलीस अंमलदार हरीष मोरे, विशाल गाडे, विनोद महाजन, प्रविण भालचिम, विठ्ठल वाव्हळ, एकनाथ जोशी, पोलीस नाईक नागेशसिंग कुंवर, पोलीस अंमलदार४२७४ देविदास वांढरे, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे, सहा.पो.फौ. शितल शिंदे यांनी केली.
0 Comments