Hot Posts

6/recent/ticker-posts

सुमारे एक लाख रुपये किंमतीची कॉपर केबल जप्त मुख्य आरोपीसह तीन अल्पवयीन मुले ताब्यात गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी

 


       पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :-  मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे साहेब यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत गुन्हे

     शाखांना आदेशीत केले आहे. गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करुन संशयित गुन्हेगारांची माहीती घेत असतांना दिनांक २१/१२/२०२४ रोजी श्रेणी पोलीस उप निरीक्षक शिवानंद स्वामी व सपोफौ संतोष इंगळे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी

    बातमी मिळाली कि, शगुन चौक येथील रेशम लाईट हाऊस दुकानाचे गोडावुन मधुन महागडया कॉपर केबलची चार ते पाच चोरटयांनी चोरी केली असुन चोरीची केबल नाणेकरचाळ पिंपरी येथील एका बंद पत्राशेडमध्ये लपवुन ठेवली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथकाला सुचना व मार्गदर्शन करुन तात्काळ

    नाणेकरचाळ पिंपरी भागात बातमीची खातरजमा करणेसाठी पाठविले. युनिट २ पथकाने घटनास्थळ परिसरातील

      सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन संशयित आरोपी निष्पन्न केले. गुरुदत्तनगर नाणेकरचाळ येथील बंदस्थितीतील पत्राशेडची झडती घेवून चोरीस गेले मालाचा शोध घेत असतांना एका बंद पत्राशेडमध्ये एक इ संशयितरित्या केबलचे बंडल लपवित असल्याचे पोलीस पथकाचे निदर्शनास आल्याने सदर इसमाला शिताफीने

       ताब्यात घेतले. त्याचे नाव सुधीर विश्वास कांबळे वय ४५ वर्षे रा. भंडारी दवाखाना जवळ, गणपती मंदीराचेमागे, कासारवाडी पुणे असे असुन त्याचे सोबत एक महीला व तीन अल्पवयीन मुलांचे टोळक्याने पहाटेच्या सुमारास लाईट हाऊस दुकानाचे गोडावुनचे भिंतीवर चढून गोडावूनमधील सुमारे एक लाख रुपये किंमतीची महागडी कॉपर केबल चोरल्याची कबुली दिली आहे. पिंपरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ११४२ / २०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३३०, ३३१ (४), ३३१ (ए) प्रमाणे दाखल घरफोडी चोरीचा गुन्हा चोवीस तासाचे उघडकीस आणला असुन गुन्हयातील मुख्य आरोपी सुधीर विश्वास कांबळे व त्याचे साथीदार तीन अल्प अल्पवईन

      मुले यांना गुन्हयाचेकामी पोलीस स्टेशनला हजर केले आहे. सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री संदिप

      डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, श्रेणी पोलीस उप निरीक्षक शिवानंद स्वामी, संतोष इंगळे, उध्दव खेडकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments