पिंपरी :-भांडण सोडविल्याच्या रागातून दोघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार करत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि.१६) दुपारी बोपखेल येथे घडली.
विशाल शामे वाल्मिकी (२६, बोपखेल) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पियुष रोकडे (२३), दीपचंद यादव (२५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी विशाल हे त्यांच्या मित्रासोबत बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी विशाल यांना बाजूला नेऊन भांडण सोडविल्याच्या रागातून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये विशाल यांच्या कानाला, डोक्यात आणि हातावर गंभीर दुखापत झाली आहे. आरोपींनी विशाल यांचा खून करण्याचा प्रयत्न केला.
0 Comments