Hot Posts

6/recent/ticker-posts

१४ वर्षांच्या वैभवचं जयपूरमध्ये वादळ, टी-20 क्रिकेटमधील सगळे विक्रम बेचिराख.. शशिकांत पाटोळे

 

       जयपूर : १४ वर्षांच्या वैभव सुर्यवंशीने आयपीएलमध्ये इतिहास घडवला आहे. आयपीएलमध्ये सगळ्यात जलद शतक करणारा वैभव सूर्यवंशी हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. ३५ बॉलमध्ये वैभव सूर्यवंशीने त्याचं शतक पूर्ण केलं. आयपीएल इतिहासातलं हे दुसरं सगळ्यात जलद शतक आहे. क्रिस गेल याने ३० बॉलमध्ये केलेलं शतक अजूनही आयपीएलमधील सगळ्यात जलद शतक आहे. या शतकासोबत वैभव सुर्यवंशी हा आयपीएलमध्ये शतक करणारा सगळ्यात लहान क्रिकेटपटू ठरला आहे.

        वैभव सूर्यवंशीच्या आधी युसुफ पठाण आयपीएलमधील सगळ्यात जलद शतक झळकावणारा भारतीय खेळाडू होता. युसुफ पठाणने २०१० साली मुंबई इंडियन्सविरुद्ध ३७ बॉलमध्ये शतक केलं होतं. वैभव सुर्यवंशी हा टी-20 क्रिकेटमध्ये शतक करणारा सगळ्यात लहान क्रिकेटपटू ठरला आहे. १४ वर्ष आणि ३२ दिवसांचा असताना वैभवने शतक केलं आहे. याआधी महाराष्ट्राच्या विजय झोलच्या नावावर हा विक्रम होता. विजय झोलने २०१३ साली १८ वर्ष आणि ११८ दिवसांचा असताना शतक झळकावलं होतं.

        गुजरातने दिलेल्या ११० रनच्या आव्हानाचं पाठलाग करण्यासाठी आलेल्या वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या जोडीने वादळी बॅटिंग केली. या दोघांनी ११.५ ओव्हर मध्ये १६६ रन केले. ३८ बॉल मध्ये १०१ रन करून वैभव सूर्यवंशी आऊट झाला. वैभवच्या या खेळीमध्ये ११ सिक्स आणि ७ फोरचा समावेश होता. प्रसिद्ध कृष्णाने वैभव सूर्यवंशीला बोल्ड केलं. आऊट झाल्यानंतर डग आऊटमध्ये जाताना वैभव सूर्यवंशी साठी सर्व प्रेषक आणि राजस्थान तसेच गुजरातच्याही खेळाडूंनी टाळ्या वाजवत त्याचं अभिनंदन केलं.


Post a Comment

0 Comments