Hot Posts

6/recent/ticker-posts

तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! पेट्रोल टाकून आई अन् २ चिमुकल्यांना जिवंत जाळलं - शशिकांत पाटोळे

 

       पुणे -: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातल्या रांजळगाव खंडाळे येथे आई आणि दोन मुलाला जिवंत जाळण्यात आलं असून खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे -अहिल्यानगर महामार्गानजीक रांजणगाव खंडाळे परिसरात ही घटना घडली. ग्रोवेल कंपनीचे कामगार सकाळी कामावर पोहोचले होते. त्यावेळी कंपनीच्या मागे त्यांना एक महिला आणि दोन लहान मुलांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर कामगारांनी तातडीने याची माहिती पोलिसानी दिली. माहिती मिळताचं रांजणगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.


       दरम्यान या तिघांना रांजणगाव खंडाळे हद्दीत आणण्यात आलं आणि त्यांच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलं असावं, असा पोलिसांना संशय आहे. मात्र पाऊस असल्यामुळे ते जळले नाहीत, तिघांचेही मृतदेह तसेच राहिले. यात आई, मुलगी आणि मुलाचा समावेश आहे. या तिघांची अद्याप ओळख पटलेली नाही. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

Post a Comment

0 Comments