Hot Posts

6/recent/ticker-posts

पिंपरी चिंचवड शहरामध्ये अग्नि तांडवाचं सत्र चालूच, पुन्हा एकदा आगीचा भडका...


        त्रिवेणी नगर तळवडे,दि.२१/०३/२०२४ गेल्या बऱ्याच अगदी काही दिवसापासून पिंपरी-चिंचवडमध्ये आगीचे घटनाचे सत्र चालूच असल्याचे पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा शहरातील तळवडे भागातील त्रिवेणी नगर या ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळते आहे. ही आग स्टार फ्लावर डेकोरेटर्स, सर्वे नंबर 162 त्रिवेणी नगर तळवडे या ठिकाणी लागली होती. या आगीच्या घटनेची माहिती प्रशासनाला श्री संजय बागडे यांनी ठीक दुपारी तीन वाजून 35 मिनिटांनी दिली.

     


    आग वर्दी विवरण:-  

      वरील घटनास्थळी आग लागल्याची वर्दी प्राप्त होताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तळवडे, चिखली, प्राधिकरण, पिंपरी, भोसरी, मोशी, व थेरगाव, अग्निशमन केंद्रांना घटनास्थळी त्वरित रवाना करण्यात आले. 



      घटनास्थळी स्टार फ्लॉवर डेकोरेटर या मंडप डेकोरेशन साहित्य पुरवणाऱ्या शॉपला व त्याच्या शेजारी असलेल्या एका गॅरेजला आग लागून कार्पेट, कपडा , फर्निचर, डेकोरेशन साहित्य लोखंडे अँगल, या सर्व मंडप डेकोरेशन साठी वापरण्यात  येणाऱ्या साहित्याला आग लागून मोठे नुकसान झाले, सदरची आग पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन दलाकडून एकूण १० अग्निशमन वाहनाच्या मदतीने विझविण्यात आली. सुदैवाने सदरच्या आगीमध्ये  कुठलीही जीवित हानी झाली नाही, आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही,पुढील तपास चालू आहे.


      वर्दीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन दलाच्या एकूण ५८ कर्मचारी/अधिकारी वर्गाने कार्य केले.




Post a Comment

0 Comments