Hot Posts

6/recent/ticker-posts

छत्रपतींचा जिरेटोप म्हणजे तुम्हाला काय बाजारात मिळणारा फेटा वाटला की काय.?


छत्रपतींचा जिरेटोप म्हणजे तुम्हाला काय बाजारात मिळणारा फेटा वाटला की काय.?

             
    
                      -: अग्रलेख :-
     •  छत्रपतींचा जिरेटोप चढवणारा जरी शेन खाणारा असला, तरी परिधान करणारा हा देशाचा पंतप्रधान होता. खरंच छत्रपतींचा आदर करणारा असता तर जिरे टोप परिधान करायला नकार देऊ शकला असता. 
     • याच माणसाने पाठीमागे मुस्लिम धर्मियांची टोपी परिधान करण्यास नकार दिला होता.
     • तुमचा केवळ निषेधच नाही,तर तुम्हाला जोड्याने हाणायला हवे.

        छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे,आमचा श्वास आहे.आणि त्यांच्या वेशभूषेची प्रतिकही आम्हाला प्राणप्रिय आहेत.त्याचा वापर तुम्ही कोण्याही लुंग्या-सुंग्यासाठी करत असाल, तर खबरदार ! आम्ही ते खपवून घेणार नाही. महाराजांच्या जनमानसातील प्रतिमेशी घट्ट बांधल्या गेलेल्या जिरेटोपाविषयी काही संकेतही दृढ आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख जशी त्यांच्या कार्यातून घडते,तशीच त्यांची प्रतिमा आणि त्यांच्या  वापरातील शस्त्र आणि वस्त्रावरूनही ठसते.

        छत्रपती शिवाजी महाराजांच्या या प्रतिमेत ६ जून १६७४ रोजी शिवराज्याभिषेकाच्या वेळी त्यांना घालण्यात आलेल्या जिरेटोपाचीही महत्त्वाची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त कोणीही तो परिधान करू नये,असा संकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिनय करताना संपूर्ण वेशभूषा परिधान केल्यानंतर जिरेटोप परिधान करण्याचा प्रघात आहे, पण इतर कोणीही तो परिधान करू शकत नाही.  इतर सर्व मावळे किंवा सरदार हे पगड्या,फेटे घालत होते.हा अधिकार केवळ छत्रपतींचा होता. इतर कोणी हा अधिकार घेण्यास पुढे धजवलेला नाही, असा ऐतिहासिक संदर्भ आहे.
        शिंदे,होळकर यांच्यासारख्या बलाढ्य सरदारांनीही कधीही जिरेटोप घातलेला नाही.आज हे स्वतःला जिरेटोप घालतात उद्या राज्याभिषेक करून मोकळे होतील.म्हणून घालू पाहणाऱ्या आणि परिधान करणाऱ्यांना जगद्गुरु तुकोबांच्या अभंगातील या ओळी लागू पडतात..
       तुका म्हणे ऐशा नरा ।
        मोजूनी माराव्या पैजारा ।।

- मुरलीधर बाबाराव हंबर्डे.
 मो.क्र.9730089791


Post a Comment

0 Comments