Hot Posts

6/recent/ticker-posts

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रहीसी यांचे हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन....


      तेहरान दि.२०: आजचा दिवस हा खूप मोठी दुर्दैवी बातमी घेऊन आलेला आहे कारण भारताचा मित्र राष्ट्र असलेल्या इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी (Ebrahim raisi) यांच्यासह नऊ जणांना घेऊन चालले हेलिकॉप्टर क्रैश झाले. सोमवारी (20 मे) सकाळी उत्तरेकडील प्रदेशात हा अपघात झाला.


       हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी (Ebrahim raisi) आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीराब्दुल्लाहियान यांच्यासह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. एका इराणी अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला. त्यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, राष्ट्रपती, परराष्ट्र मंत्री आणि हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या हेलिकॉप्टरचा अवशेष अझरबैजानच्या टेकड्यांमध्ये सापडला होता. त्यात राष्ट्रपती रईसी यांच्यासह 9 जण होते.

      रविवारी संध्याकाळी 7.00 वाजण्याच्या सुमारास अझरबैजानजवळ हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. रात्रभर त्याचा शोध सुरू होता. परिसरात जोरदार पाऊस, धुके आणि थंडीमुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. यादरम्यान तीन बचाव कर्मचारीही बेपत्ता झाले.

       राष्ट्रपती रईसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन यांच्याशिवाय, हेलिकॉप्टरमध्ये पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलिक रहमाती, तबरीझचे इमाम मोहम्मद अली अलीहाशेम, एक पायलट, सहवैमानिक, क्रू प्रमुख, सुरक्षा प्रमुख आणि अंगरक्षक होते.


Post a Comment

0 Comments