Hot Posts

6/recent/ticker-posts

बदलापूर येथील महाराष्ट्राला काळीमा फासनाऱ्या दुर्दैवी घटनेचा पिंपरी चिंचवड मध्ये आंदोलन व निदर्शने करून निषेध व्यक्त केला.

 


      • नराधम आरोपीला तात्काळ फासावर लटकवा सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा बनसोडे यांची सरकारला मागणी.

         पिंपरी चिंचवड दि.२३/०८/२०२४-: कोलकत्ता येथील महिला डॉक्टरच्या रेप आणि हत्या प्रकरण देशभर गाजत असतानाच, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातही महाराष्ट्राला काळीमा फासणारी अत्यंत घनस्पद आणि दुर्दैवी घटना घडली. मुंबई नजीकच्या बदलापूर या ठिकाणी एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर त्याच शाळेतील सफाई कामगार असलेल्या नराधम अक्षय शिंदे याने त्या मुलींना शाळेच्या बाथरूम मध्ये घेऊन जाऊन अत्याचार केले. त्यानंतर त्यातीलच एका लहान मुलीने आपल्या आई-वडिलांना लघवीच्या जागी मुंग्या येत असल्याचे सांगितले. 


      तेव्हा कुठे हे प्रकरण उजेडात आले आणि संपूर्ण महाराष्ट्रात  संतापाची लाट उसळली. महाराष्ट्रभर ठीक ठिकाणी आंदोलने निदर्शने आणि निषेध व्यक्त केला जात आहे. 

          पिंपरी चिंचवड येथेही बदलापूर येथील लहान बालिकांवर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ भिमशक्ती संघटना व काँग्रेस परिवहन विभाग पिंपरी चिंचवड शहर यांचे वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे निषेध आंदोलन करण्यात आले.


        सदरील आंदोलनाचे नेतृत्व भिमशक्ती पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष सुरज गायकवाड यांचे नेतृत्वाखाली घेण्यात आले. या आंदोलनाचे नियोजन हरीश डोळस (सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर) मिलिंद फडतरे (सचिव पिंपरी चिंचवड शहर ) प्रतिभा बनसोडे (युवा भीमशक्ती उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर ) प्रतिभा कांबळे (अध्यक्ष औद्योगिक सेल काँग्रेस  पिंपरी चिंचवड शहर) यांनी केले.


       यावेळी माजी नगरसेविका निगाताई बारस्कर, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, भरत वाल्हेकर (वरिष्ठ उपाध्यक्ष काँग्रेस  पिंपरी चिंचवड शहर ) नरेंद्र बनसोडे (वरिष्ठ उपाध्यक्ष काँग्रेस  पिंपरी चिंचवड शहर ) विजय हिंगे(पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष भिम शक्ती संघटना )डॉ. मनीषा गरुड (डॉक्टर सेल पिंपरी चिंचवड शहर) विजय ओव्हाळ (अध्यक्ष मागासवर्गीय विभाग पिंपरी चिंचवड शहर ) विशाल सरवदे (अध्यक्ष रोजगार व स्वंयरोजगार सेल काँग्रेस ) जेवियर ॲन्थोनी अध्यक्ष ग्राहक सेल पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस ) गौरी शेलार (नेत्या काँग्रेस भोसरी विधानसभा) तारीक भाई, रमेश आप्पा कांबळे, शिवशंकर उबाळे, (भिमशाही संघटना अध्यक्ष )नरेंद्र सोनटक्के (उपाध्यक्ष युवक भिम शक्ती पिंपरी चिंचवड ) फिरोज तांबोळी (उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड काँग्रेस परिवहन विभाग ) जितेन्द्र छाबडा ( उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस) ॲड.अनिकेत रसाळ (उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस) , कपिल डोळस अजय शेरखाने प्रमोद शेलार अशोक गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments