Hot Posts

6/recent/ticker-posts

पिंपरी चिंचवड मध्ये आक्रोश नारीशक्तीचा या भव्य मोर्चाचे आयोजन.

 


        पिंपरी पुणे दिनांक 30 ऑगस्ट 2024 अल्पवयीन मुली मुले युती महिलावर बलात्कार सामूहिक बलात्कार आणि हत्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे अशा घटनांना पायबंध बसावा आणि यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील महिला व विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था संघटना मंडळ ट्रस्ट आदींच्या प्रतिनिधींचा भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मोर्चाचे समन्वयक मानव कांबळे यांनी दिली शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. 


       यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पडले आहे की महिला वरील अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे राष्ट्रीय गुन्हे सर्वेक्षणाचा आढावा घेतल्यास दर तासाला देशामध्ये 50 पेक्षा जास्त अशा घटनांची नोंद होत आहे मागील वर्षी देशात चार लाख 45 हजार पेक्षा जास्त बालकांच्या मृत्यूची गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यामुळे शहरात तसेच ग्रामीण भागातील महिला भीतीच्या छायेत जगत आहेत बलात्कार करणाऱ्यांना कायद्याचा पोलिसांचा व समाजाचा धाक राहिलेला नाही अवघ्या चार वर्षाच्या चिमुरडी ते 70 वर्षाचे वयोवृत्त महिला या नराधमांची बळी ठरली आहे आधुनिकतेच्या नावाखाली सुरू असणारा स्वयराचार यास कारणीभूत आहे संविधानिक अधिकार स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलता आणि विभक्त तेला प्रोत्साहन दिले जात आहे यावर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नाही आणि कायद्याचेही बंधन नाही काही अंशी अशा घटनांना तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता आणि सोशल मीडिया बेरोजगारी जबाबदार असल्याचे दिसते यासाठी सामाजिक प्रबोधन आणि माध्यमिक शालेय स्तरावर मुला-मलींना लैंगिक शिक्षण सुरू करणे आवश्यक आहे. सर्व क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारी स्त्री शक्ती सध्या भयभीत आणि असुरक्षित असल्याचे दिसते अत्याचारग्रस्त पीडित युती महिलांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने देशभर शक्ती कायदा मंजूर करावा व त्याची कडक अंमलबजावणी करावी याकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांच्या वतीने नारीशक्ती मोर्चाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. 

        तसेच हा मोर्चा रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता आकुर्डी खंडोबा माळ चौकातून सुरू होणार आहे आकुर्डी गावठाण म्हाळसाकांत विद्यालय चौक ते निगडी लोकमान्य हॉस्पिटल ते तहसीलदार कार्यालय निगडी कैलासवासी मधुकर पवळे उड्डाणपूल येथे मोर्चाचा स्मारक होणार आहे त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात येईल. 

      आणि या मोर्चा शहरातील सर्व संवेदनशील नागरिकांनी सहभागी होऊन महिलावर अन्याय अत्याचार होणाऱ्या घटनाबाबत निषेध व्यक्त करावा असे आवाहन समन्वयक मानव कांबळे यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments