Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार महेश लांडगे यांच्या प्रतिमेला "जोडे मारो आंदोलन."


• डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवर स्वाक्षरी केल्याने तीव्र संताप.

            पिंपरी चिंचवड दि.२९/०९/२०२४-: विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान कदापि सहन केला जाणार नाही, असं म्हणत विविध सामाजिक संघटनांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर आमदार महेश लांडगे यांच्या निषेधार्थ आंदोलन करुन त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला.


          याबाबत सविस्तर वृत्त असे की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या जाहिरातबाजीत भोसरी मतदासंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या एका जाहिरातीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रावर आमदार महेश लांडगे यांची सही वापरण्यात आली आहे. ही जाहिरात शहरातील विविध भागात तसेच शेकडो रिक्षांवर करण्यात आली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील विवीध सामाजिक संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 


         या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक तसेच पुरोगामी संघटनांच्या वतीने आज रोजी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आंदोलनासाठी उपस्थित होता.आंदोलनात आमदार महेश लांडगे यांच्या प्रतिमेला "जोडे मारो आंदोलन" करुन लांडगे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. 

         या आंदोलनात जन आंदोलन चळवळीचे प्रणेते मानव कांबळे,माजी नगरसेवक मारुती भापकर,धम्मराज साळवे,नरेंद्र बनसोडे,शिवशंकर उबाळे,माऊली बोराडे,शांताराम खुडे,हौसराव शिंदे,जितेंद्र छाबरा,गौतम आरकडे व प्रमोद क्षिरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे,दिपक खैरनार,राजन नायर,सिद्धार्थ शिरसाट,राम भंडारे,सुधाकर इंगळे,सचिन काळभोर,यांसह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.


Post a Comment

0 Comments