पिंपरी-दि.२८ सप्टेंबर २०२४:- थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग हे भारतमातेवर निस्सीम प्रेम करणारे,प्रखर देशभक्त आणि दूरदर्शी विचारवंत होते, त्यांचे कार्य सुवर्णाक्षरात लिहीण्यासारखे असून त्यांच्या देशभक्तीचा तसेच धाडसी वृत्तीचा वारसा सर्वांनी जोपासला पाहिजे असे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.पुणे मुंबई जून्या महामार्गावर दापोडी चौक येथील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुषपहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास महानगरपालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे,माजी नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कनिष्ठ अभियंता गौरी कदम, विज पर्यवेक्षक विजयकुमार उईके तसेच विविध विभागातील कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
0 Comments