!!लातूर शहर व औसा तालुका या दोन्ही विधानसभा क्षेत्रातातुन उमेदवारी अर्ज दाखल करणार व लढणार!!नौशाद शेख!!
लातूर :औसा तालुका विधानसभा क्षेत्र येथून सक्रिय सामाजिक कार्यकर्ते व दैनिक जय हिंद महाराष्ट्राचे संपादक श्री.नौशाद इकबाल शेख यांना स्वराज शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ.करुणा मुंडे यांनी पक्षाचे अधिकृत विधानसभेचे उमेदवार म्हणून आज पक्ष कार्यालय येथून घोषित केले आहे.नौशाद शेख हे मूळचे केसर जवळगा या गावाचे सुपुत्र आहेत सतत समाजामध्ये चांगले काम करणे पीडित शोषित वंचित यांच्या मदतीला धाऊन जाणे समाजासाठी निस्वार्थ समाजसेवा करणे अशा अनेक त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना औसा विधानसभेची उमेदवारी दिली आहे.म्हणून मुंडे यांनी जाहीर केले आहे.
शैक्षणिक,सामाजिक, राजकीय,क्षेत्रामध्ये व चळवळी मध्ये धडाडीने कार्य करून तळागाळा तील लोकांना त्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी संघर्ष करणारा व आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनहितार्थ वाचा फोडणारा एक लढया पत्रकार म्हणून शेख यांची समाजामध्ये ओळख आहे.नौशाद शेख याचं पत्रकारिता मध्ये शिक्षण झाले असून राजकीय दृष्ट्या पाहता त्यांना चांगला अभ्यास आहे लातूर जिल्ह्यात व औसा तालुक्यातील युवकांमध्ये व समाजा मध्ये जन सेवेच्या माध्यमातून त्यांनी एक सक्रिय धडाडीचा कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण केली आहे.
तसेच 2024 मध्ये धाराशिव येथून लोकसभा त्यांनी याच पक्षाच्या चिन्हावर लढवली होती.शेख यांचा समाजा मधील व औसा तालुक्यातील लोकांशी व युवकांशी असलेला मोठा जनसंपर्क पाहून व राजकीय अनुभव पाहून अशा सामान्य पण वैचारिक लढवय्या सेवकाला विधान भवनात जाऊन जनतेचे प्रश्न मांडता यावे या साठी औसा तालुका येथून विधानसभेची उमेदवारी पक्षाच्या वतीने नौशाद इकबाल शेख यांना जाहीर केले आहे म्हणून स्वराज शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ.करुणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे!! माध्यमांनी नौशाद शेख यांना काही प्रश्न विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली संधीचे सोने करणार व सर्व सामान्य मतदार माता बंधू च्या अधिकारासाठी व न्याय हक्कासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणार सोबत लातूर शहर व औसा तालुका या दोन्ही विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.तसेच स्वराज शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ.करूना ताई मुंडे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही संधी मला दिल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो!!जय हिंद.
0 Comments