पिंपरी चिंचवड दि. २० ऑक्टोंबर २०२४(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी पक्षाकडून भोसरी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी म्हणून प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा पवार यांना लेखी पत्राद्वारे मागणी करण्यात आली होती त्या अनुषंगाने प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी स्थानिक भोसरी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी पदाधिकार्यांशी सोबत चर्चा न करता थेट पद्धतीने कार्यकर्त्यांचे म्हणणं ऐकून घेतले नसून दबाव तंत्राचा वापर करून आमदार महेश लांडगे यांना भोसरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.
त्या संदर्भात जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असून भोसरी विधानसभा मतदारसंघातील जेष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक व निष्ठावांतांना डावलून आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांच्या उमेदवारी बाबतीत आक्षेप घेण्यात आला होता.
त्या संदर्भात पक्षश्रेष्ठी व कोअर कमिटी यांनी स्वतंत्र बैठक घेऊन भोसरी विधानसभा मतदारसंघ येथील जुन्या कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते माजी नगरसेवक यांची बैठक घेऊन उमेदवारी बाबत आढावा अहवाल सादर न करता थेट पद्धतीने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते माजी नगरसेवक व कार्यकर्ते नाराज झाले असून पक्षश्रेष्ठी यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघ येथील उमेदवारी बाबत सर्वांच्या सहमतीने निर्णय घ्यावा ही विनंती या स्वरूपाचे निवेदन श्री. सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी चिटणीस पिंपरी चिंचवड शहर यांनी पक्षश्रेष्ठींना केल्याचे समजते.
0 Comments