पिंपरी :- भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला. वल्लभनगर येथे एसटी बसस्थानकाजवळ मंगळवारी (दि.२६) सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. अविनाश व्यंकटेश तलवार (वय २०), रमेश अध्याप्पा म्हेत्रे (१९, दोघे रा. गांधीनगर, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत.
संत तुकारामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश एका शोरूममध्ये कामाला होता. रमेश शिक्षण घेत होता. ते दोघेही मंगळवारी सकाळी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी वल्लभनगर येथे एसटी बसस्थानकाजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे रस्त्यावर जोरात पडल्याने व डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
त्यांना पिंपरी येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.
0 Comments