Hot Posts

6/recent/ticker-posts

महापालिकेच्या कासारवाडी येथील महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक दिन साजरा...

 


       पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील महिलांच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संस्थेमध्ये वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेऊन प्रशिक्षणार्थ्यांना अल्पसंख्यांक दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. यावेळी संस्थेचे प्राचार्य ज्योत सोनवणे, निदेशक बबीता गावंडे, हेमाली कोंडे, सोनाली नीलवर्ण, वंदना चिंचवडे, मनसरा कुमावणी तसेच कार्यालयीन कर्मचारी मोहन कुदळे, संगीता पथवे, मोईन शेख, साक्षी काळभोर, अनघा लांडे, गणेश गायकवाड, उपस्थित होते.

      निदेशक पुनम गलांडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आयोजन निदेशक सिद्धार्थ कांबळे यांनी केले. यावेळी प्राचार्यांतर्फे सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे व निदेशकांचे आभार मानण्यात आले. तसेच याप्रसंगी घेण्यात आलेल्या स्पर्धांचे निकाल घोषित करण्यात आले.

निबंध स्पर्धा क्रमांक..

1.सुजाता भोसले 

2.कांचन निवृत्ती खांडवे 

3.नेहा सुनील नलावडे 

 वकृत्व स्पर्धा क्रमांक 

1 पूजा माणिक आढाव 

2शोभा  रामभाऊ झोपे 

3.प्रगती वैजनाथ अलुरे 

यावेळी सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन चांगल्या पद्धतीने अल्पसंख्यांक दिन साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments