Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी मार्केट व मांईदे चौकातील ०४ कापड दुकानात झालेल्या चारी उघड

 


अवधुतवाडी पोलीस स्टेशनची दमदार कामगीरी

       अवधूत वाडी-: मा पोलीस अधिक्षक कुमार चिंता सो यांनी घरफोडी करणारे आरोपी शोध घेवुन शहरातील होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासंदर्भात आदेश दिले होते. त्या अनुषांगाने श्री नरेश रणधीर सो पोलीस निरीक्षक अवधुतवाडी यांनी आपले गुप्त बातमीदार यांना सतर्क करून माहीती काढली असता नेताजी मार्केट व माईदे चौक येथे कापड दुकान चोरी करून स्वताचे कपडे विकीचे दुकान थाटण्याच्या तयारीत असल्याबाबत दोन संशयीत इसम अवधुतवाडी पोलीस स्टेशन हददीत राहत असल्याची माहीती पोलीस निरीक्षक श्री नरेश रणधीर यांना मिळाली त्यांनी अवधुतवाडी गुन्हे प्रकटी करण पथकाला सदर इसमाच्या मागावर पाठवुन त्यास ताब्यात घेण्यासंदर्भात आदेश दिल्याने अवधुतवाडी गुन्हेप्रकटीकरण पथकाने त्या दोन संशयीत इसमाचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेतल असता त्यांचे नाव गाव पत्ता विचारले असता त्यातील एका इसमाचे नाव तेजस बळिराम चव्हाण वय ३३ वर्षे रा घांटुंबा पो शिवणी ता घांटजी जि यवतमाळ तर दुसऱ्या इसमाचे नाव प्रमोद साहेबराव चव्हाण वय २४ वर्षे रा घोटी ता घाटंजी जि यवतमाळ असे असुन त्याच्या कडे अवधुतवाडी पोलीस स्टेशन हददीत कापड दुकानात केलेल्या चोरीच्या अनुषंगाने बारकाईने तसेच विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यानी यवतमाळ शहरात ठिकठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे आरोपींकडुन अवधुतवाडी पोलीस स्टेशन हददीतील एकुण ०४ घरफोडी/दुकान चोरी चे गुन्हे उघडकीस आले असुन यातील आरोपीं कडुन गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकल तसेच चोरी करण्यासाठी कुलुप कट करता यावे म्हणुन वापरलेले एक बॅटरी वर चालनारे कटर/अॅडर दोन चार्जीग बॅटरी सह कापड दुकानात चोरी केलेला शर्ट पॅन्ट वा मुददेमाल अंदाजे एकुण ५,००,००० किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.

      सदरची कामगीरी मा पोलीस अधिक्षक श्री कुमार चिंता सो तसेच मा अपर पोलीस अधिक्षक श्री पियुष जगताप सो, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनेश बैसाने सो, पोलीस निरीक्षक श्री नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहा पोलीस निरीक्षक श्री रोहित चौधरी, सफौ १६९१ गजानन वाटमोडे, सफौ ६११ मेश्राम, पोहवा ११ विशाल भगत, पोहवा १५९९ बलराम शुक्ला, पोहवा ३९० रवि खांदवे, पोना १३९२ रूपेश ढोबळे, पोशी २२६ मोहम्मद भगतवाले, पोशी ११९८ रशीद शेख, पोशी १० योगेश चोपडे यांनी बजावली

Post a Comment

0 Comments