नवी मुंबई प्रतिनिधी :- नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत बेकायदेशीर वास्तव्यास असणा-या बांगलादेशी नागरीकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त, श्री. मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, श्री. संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, श्री. अमित काळे यांनी दिलेले आहेत. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षावे पोनि. पुथ्वीराज घोरपडे यांना बांगलादेशी नागरीकांच्या बेकायदेशीर वास्तव्याबाबत मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने दिनांक २१/१२/२०२४ रोजी पहाटे कोपरा गांव, सेक्टर १०, खारघर येथे छापा टाकला असता, सदर ठिकाणी ०१ पुरुष व ०३ महिला मिळुन आले. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाबाबत कोणताही पुरावा अगर कागद पत्रे मिळुन न आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता घुसखोरीच्या मार्गाने कोणत्याही वैध प्रवासी कागपत्रांशिवाय सन २०२३ मध्ये भारतात प्रवेश करून राहत होते. भारतीय नागरीक असल्याबाबत कोणताही पुरावा सादर करू शकले नाहीत म्हणून त्याच्या विरुध्द खारघर पोलीस ठाणे येथे गुन्हा रनि नंबर ४३१/२०२४ पारपत्र (भारतात प्रवेश) १९५० कलम ३ (ए) सह ६ (ए), व विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास खारघर पोलीस ठाणे करत आहे. तसेच दिनांक २२.१२.२०२४ रोजी पहाटे कोपरी गांव, से. २६, एपीएमसी येथे छापा घातला असता, १ पुरुष व ५ महिला मिळुन आल्या, त्यापैकी एका महिलेकडे एक लहान मुल असल्याचे आढळुन आले. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाबाबत कोणताही पुरावा अगर कागद पत्रे मिळून न आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता कोणत्याही वैध प्रवासी कागपत्रांशिवाय मागील काही वर्षापासुन भारतात प्रवेश करून राहत होते.
त्यांच्याकडे ते भारतीय नागरीक असल्याबाबत कोणताही पुरावा सादर करू शकले नाहीत म्हणुन त्यांच्या विरूध्द एपीएमसी पोलीस ठाणे येथे गुन्हा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळून आलेले पुरुष हे बिगारी काम तसेच महिला या घरकाम करत असल्याचे समजुन आले आहे. कारवाई दरम्यान सेक्टर १८, खारघर येथे इसम नामे मोनिल कबीर खान, वय ४४ वर्ष, मुळ राहणार घासीबडीया, नर्गती, मोहाजोन, नोडाईल, बांगलादेश हा मिळुन आला असुन त्याच्याकडे वैध पासपोर्ट होता पंरतु व्हिजा एक वर्षा पुर्वी संपला होता. त्यास ताब्यात घेवुन पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा यांच्या आदेशाने डिपोर्ट करण्यात येत आहे. सदरचे कारवाई मध्ये सहा. पोलीस आयुक्त, AHTU, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकामध्ये वपोनि / पृथ्वीराज घोरपडे, सपोनि / अलका पाटील, पोशि/२६५४ ठाकुर, पोशि/३०९२ चव्हाण, पोशि/३२३९ पारासुर, पोशि/३४५२ कोलते, मपोहवा / ३६ धोणसेकर, मपोना/२५०४ अडकमोल, मपोना/२९८४ भोये हे सहभागी होते. नवी मुंबई पोलीसांकडुन सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येत आहे की, "बांगलादेशी नागरीक यांना घर भाडयाने दिल्यास, कामासाठी ठेवल्यास संबधीत घरमालक, बांधकाम व्यवसाईक किंवा परदेशी नागरीकांना मदत करणारे इतर व्यक्ती यांच्यावर परकीय नागरीक कायदा कलम १४ (क) तसेच रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेनर्स अॅक्ट १९३९ कलम ५ अन्वये कारवाई करण्यात येवुन त्यांना सहआरोपी करण्यात येणार आहे."
0 Comments