Hot Posts

6/recent/ticker-posts

महिलेस मारहाण करून, जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेकडुन तात्काळ अटक.

 

      पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :- दिनांक १९/१२/२०२४ रोजी सांगवी पोलीस ठाणे हद्दीत एक महिला टयुशन घेण्याकरीता लिफ्ट मधुन जात असताना अचानक त्यांच्या मागुन एक अनोळखी इसम लिफ्ट येवुन, त्याने सदर महिलेच्या डोक्यात हत्याराने मारून, महिलेस जखमी करून, तिच्या गळयातील सोन्याची चेन जबरदस्तीने चोरी करून नेलेबाबत सांगवी पोलीस स्टेशन गु.र.नं. ५१३/२०२४ भा.न्या.सं. कलम ३११, ३०९ (६) प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन, मा. पोलीस आयुक्त, . पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेतील पथकांना सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन

        तात्काळ अटक करणेबाबत आदेशीत केले होते. त्याअनुशंगाने पोलीस उप आयुक्त श्री संदीप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे १, श्री डॉ. विशाल हिरे सहा पोलीस आयुक्त गुन्हे २, श्री. बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ४, मालमत्ता गुन्हे विरोधी पथक व गुंडा विरोधी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार करून, गुन्हयाचा समांतर तपासकरून,

       सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन अटक करणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे युनिट ४, मालमत्ता गुन्हे विरोधी पथक व गुंडा विरोधी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळावरील व आजुबाजुचे परिसरातील सीसीटिव्ही

          फुटेजची सतत तीन दिवस रात्र तपासणी करून, सीसीटिव्ही मध्ये संशयीत इसम बनावट नंबर प्लेट वापरलेल्या मोटार सायकल वरून पळुन जाताना दिसुन आला. त्यावर सदर संशयीत इसम ज्या मार्गोने आला व पळुन गेला त्या मार्गोचा तांत्रिक विश्लेषाद्वारे तपास करून, तसेच संशयीत इसमाने वापरलेल्या वाहनाबाबत सखोल चौकशी करून संशयीत इसमांस निष्पन्न करण्यात आले. संशयीत आरोपीचा वरील पथक शोध घेत असताना मिळालेल्या बातमीच्या आधारे आरोपी

       नामे ईश्वर कैलास वाल्हेकर, वय ३४ वर्षे, रा. बिल्डींग नंबर १५ चे मागे, बौध्दनगर, एम.आय.डी.सी. पिंपरी, पुणे यास दिनांक २२/१२/२०२४ रोजी ताब्यात घेवुन, प्राप्त सीसीटिव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषनाद्वारे केलेल्या तपासाच्या आधारे नमुद आरोपीने सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न

       झाल्याने, त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे साो, पिंपरी चिंचवड, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), संदीप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, डॉ. विशाल हिरे, सहा

       पोलीस आयुक्त गुन्हे २, श्री बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ४ पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप सावंत, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक हरिष माने, पोउनि भरत गोसावी, सांळुखे, जगताप, युनिट ४ चे पोलीस अंमलदार नदाफ, तुषार शेटे, जायभाये, मुंढे, गुट्टे, प्रशांत सैद, गावंडे, चव्हाण, राणे, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार पुलगम, मोरे, गायकवाड, कदम,

       गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गंभीरे, मोहिते, कदम, गेंगजे, गायकवाड, तांत्रिक विश्लेषन विभागाचे माळी व ननावरे यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments