Hot Posts

6/recent/ticker-posts

वळप गावातील महिलेची हत्या करून जबरी चोरी करणा-या आरोपीस गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल यांनी ठोकल्या बेडया"

 

      ठाणे प्रतिनिधी :- पनवेल तालुका पोलीस ठाणे हददीतील वळप गावातील महिला नामे सौ. संगिता राजेंद्र आगवणे, वय ४९ वर्षे हया दिनांक ०७/१०/२०२४ रोजी खाजगी शिकवणीचे क्लास संपवुन गावा बाहेरील आपल्या घरी पायी चालत जात असताना कोणीतरी अज्ञात आरोपी इसमाने जबरी चोरी करण्याचे उददेशाने त्यांचा गळा आवळुन खुन करून मयत महिलेच्या अंगावरील सोन्याचे मंगळसुत्र, कानातील झुमके व सोनसाखळया, पोको कंपनीचा मोबाईल व पर्स असा एकुण १,९५,८५०/- रूपये किंमतीचे ऐवज जबरी चोरी करून नेला म्हणून पनवेल तालुका पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर २७३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०३, ३११ प्रमाणे नोंद आहे. महिलेचा अशा प्रकारे निघृण खून करून जबरी चोरीचा हा गंभीर गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेबाबत पोलीस आयुक्त, श्री. मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, श्री. संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, श्री. अमित काळे यांनी आदेशीत केले होते. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने अजयकुमार लांडगे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उमेश गवळी यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शाखा कक्ष-०२ कडील अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला. सदर घटना दिनांक ०७/१०/२०२४ रोजी सायंकाळी १९:०० ते १९:३० वाजताच्या दरम्यान घडली असुन गुन्हयाचे घटनास्थळ हे निर्जन ठिकाणी असल्याने तसेच कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने आरोपीबाबत निश्चित माहिती मिळण्यात अडचणी होत्या.

       गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने त्या परिसरातील अनेक संशयीतांकडे प्रत्यक्ष विचारपुस करून त्यांच्या मोबाईल वापराचा सखोल तपास करून पोलीस पथकाने काही संशयीताविरूध्द लक्ष केंद्रीत केले होते. त्यापैकी एका संशयीताकडे जबरीने चोरून नेलेला माल असल्याचे व तो गुन्हा घडल्यानंतर रिवा, मध्यप्रदेश येथे निघुन गेल्याचे निष्पन्न झाले. एक पथक रिया येथे पाठवुन सदर संशयीताकडे जबरी चोरीचा माल कसा आला याबाबत कौशल्यपूर्ण चौकशी व तांत्रिक तपासामध्ये वळप गावात राहणारा आरोपी इसम नामे शरद घनश्याम साहू, वय ४५ वर्षे, रा. ऊ १ म नंबर, भामा पाटील बिल्डींग, पहिला मजला, वळप गाव, ता. पनवेल, जि. रायगड मुळ रा. शिसव सामीली गोलासर, ता. गोप, जि. पुरी, राज्य आसाम याने सदरचा गुन्हा केला असल्याचे प्राथमिक दृष्टया निष्पन्न झाले.

        त्यावरून वर नमुद इसमास वळप गावातुन ताब्यात घेवून त्याच्याकडे केलेल्या सखोल आणि कौशल्यपुर्ण तपासात त्यानेच सदर महिलेचा गळा आवळुन खुन करून तिचे अंगावरील सोन्याचे दागिणे, मोबाईल फोन चोरी केला असल्याचे सांगितले आहे.

       गुन्हे शाखा कक्ष ०२, पनवेल, नवी मुंबई चे पथकाने सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासुन अथक परिश्रम करून सदरचा गुन्हा करणा-या आरोपी इसमाबाबत काहीएक माहिती नसताना देखील गुन्हयाचा सतत व चिकाटीने तपास करून आरोपीस ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे. पुढिल तपास पनवेल तालुका पोलीस ठाणे करीत आहेत. सदर आरोपीस दिनांक २१/१२/२०२४ रोजी २१:२६ वाजता अटक करून आरोपीची दिनांक २६/१२/२०२४ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे.

        सदरची उल्लेखनिय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. उमेश गवळी, सपोनि, प्रविण फडतरे, अजित कानगुडे, पोउनि. मानसिंग पाटील, प्रताप देसाई, अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार रमेश शिंदे, अनिल पाटील, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, निलेश पाटील, दिपक डोंगरे, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, सागर रसाळ, अजित पाटील, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, पोलीस शिपाई- विक्रांत माळी, लवकुश शिंगाडे, पोलीस हवालदार जगदीश तांडेल, पोलीस शिपाई-अमोल मोहिते, कुंभफळे, महिला पोलीस शिपाई अदिती काकडे, मनिषा केदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments