पिंपरी :- बलशाली महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न घेवून राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सूत्रे हातात घेतली आहेत. आधुनिक युगाशी स्पर्धा करीत महाराष्ट्र प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकार सक्षमपणे काम करील, महाराष्ट्र आता थांबणार नाही असा विश्वास भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे की, भाजपा-शिवसेना-एनसीपी-आरपीआय व मित्र पक्ष महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली आता महाराष्ट्र थांबणार नाही. प्रखर हिंदूत्व आणि विकासाच्या वाटेवर महाराष्ट्र राज्य भारत देशाला जागतिक महासत्ता घडवण्यासाठी मोलाचे योगदान देईल, यात शंका नाही असे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले.
0 Comments