Hot Posts

6/recent/ticker-posts

खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक, गुन्हे शाखेची कामगिरी

 

०२ वर्षापासून चैन स्नॅचिंग मोका व इतर ०४ चैन स्नॅचिंग गुन्हयात वाँटेड असलेल्या सराईत

गुन्हेगारास घेतले ताब्यात

      पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :- मा.पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पाहीजे / फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेवुन, त्यांना अटक करण्याची विशेष मोहीम राबविणेबाबत आदेशीत केले होते. मा. पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री संदीप डोईफोडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील खंडणी विरोधी व औदयोगिक तक्रारी निवारण पथकाचे पोलीस उप-निरीक्षक सुनिल भदाणे तसेच पोहवा प्रदीप पोटे, प्रदीप गोडांबे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे व किरण जाधव हे पाहीजे / फरारी आरोपीची माहिती काढत असतांना, पोउपनिरी सुनिल भदाणे यांना बातमी

   मिळाली की, दिघी पोलीस ठाणे गु. रजि नं. १९५/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४ सह मोक्का कायदा कलम ३(१),३(४) मधील पाहिजे आरोपी नामे रोहित मैनावत हा वडु बु गावामध्ये आहे. अशी खात्रीशीर

   बातमी मिळाल्याने, सदरची माहिती वरिष्ठांना कळवून, पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे व स्टाफ वडु बु/ /, ता. शिरूर, जि. पुणे या ठिकाणी जावुन सापळा लावुन पाहीजे आरोपी रोहित किशोर मैनावत ऊर्फ राजपूत, वय २१ वर्षे, रा. वढू बु//, ता. शिरूर, जि. पुणे यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास खंडणी

    विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे कार्यालयात आणून आरोपीचा अभिलेख तपासला असता आरोपी हा दिघी पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. १९५ / २०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४ सह मोक्का कायदा कलम ३(१),३(४) या मोका गुन्हयात पाहीजे आरोपी तसेच १) दिघी पोलीस ठाणे गुरक्रं. १५८ / २०२३ भा. द. वि कलम ३९२, ३४ २) दिघी पोलीस ठाणे गुरक्रं. २१४ / २०२३ भा. द. वि कलम ३९२, ३४ ३) दिघी पोलीस ठाणे गुरक्रं. २१८/२०२३ भा. द. वि कलम ३९२, ३४ ४) पिंपरी पोलीस ठाणे गुरक्रं. ४१९ / २०२३ भा.

    द. वि कलम ३९२, ३४ या गुन्हयात देखील पाहीजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीस पुढील कार्यवाहीकामी मा. सपोआ, चाकण विभाग यांचे ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी रोहित किशोर मैनावत ऊर्फ राजपूत हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत चैन स्नॅचिंग करणार गुन्हेगार असून, त्याचेवर पुणे ग्रामीण हद्दीत चैन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे मा. श्री. संदिप डोईफोडे,

      सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे - २ मा. श्री. बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोउपनि सुनिल भदाणे, पोलीस अंमलदार प्रदीप पोटे, प्रदीप गोडांबे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, किरण जाधव, किशोर कांबळे, किरण काटकर तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोअंम हुलगे यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments