पुणे-: स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर गु.र.नं. १८०/२०२४ भा.द.वि. कलम. ३७९ मधील फिर्यादी हे दि.१४/०५/२०२४ रोजी दुपारी ०१/३० वाजण्याच्या सुमारास आळंदी पीएमपी एमएल बस स्टॉप येथे येथे बसमध्ये चढत असताना मोठ्या प्रमाणाय गर्दी होती सदर गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांच्या डावे हातातील सोन्याची बांगडी चोरी केली होती. त्यावरुन फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यावरुन वर नमुद गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांना आदेशीत केले होते.
सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशनकडील वामिनी मार्शलवरील महिला पोलीस अंमलदार अनिता घायतडक या दि. १९/१२/२०२४ रोजी १४/३० वा. सुमारास स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना कात्रज पीएमपीएल बस स्टॉप येथे काळा व हिरव्या रंगांचा टॉप परिधान केलेल्या अशा वर्णनाच्या दोन महिला ह्या संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून आल्याने त्यांना त्यांचेवर संशय निर्माण झाल्याने त्यांनी लागलीच मदतीकामी तपास पथकातील अंमलदार संदीप घुले व सुजय पवार यांना सदर ठिकाणी बोलावुन घेवुन सदर महिलांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचा नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता अनुक्रमे १) दुर्गा अविनाश उपाध्याय वय ३० वर्षे रा. सध्या म्हाडा कॉम्पलेक्सजवळ, खडकी पुणे, मुळगाव सरकारी दवाखान्याजवळ, दर्याचे पाठीमागे, बापुनगर गुलबर्गा कर्नाटक २) लक्ष्मी भिवा सकट वय २५ वर्षे रा. सध्या म्हाडा कॉम्पलेक्सजवळ, खडकी पुणे, मुळगाव होम मैदान सिद्धेश्वर मंदीराजवळ सोलापुर असे असल्याचे सांगितले सदर संशयित महिलांना सदर ठिकाणी विनाकारण फिरण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली तद्नंतर सदर महिलांना महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने स्वारगेट पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचेकडे मपोशि धायतडक यांचे समक्ष पोलीस अंमलदार संदीप घुले व सुजय पवार यांनी कौशल्यपुर्ण तपास केला असता त्यांनी सांगितले कि, गेले ७ ते ८ महिन्यांपुर्वी त्या दोघींनी स्वारगेट येथील आळंदी पी.एम.टी बस स्टॉप येथे एका महिलेच्या हातातील बांगडी चोरी केली होती. असे सांगितल्याने स्वारगेट पोलीस स्टेशन कडील गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता सदर आरोपीतांनी स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १८०/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर महिला आरोपींना दाखल गुन्हयात अटक करुन पोलीस कोठडी मधील तपासादरम्यान त्यांचेकडुन ०४,८८,०००/- रुपये किंमतीचे ६० ग्रॅम वजनाचे (६ तोळे) सोन्याचे दागीने तपासादरम्यान जप्त करुन स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले सोने चोरीचे एकुण ०५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सवरची कामगिरी ही मा. श्री. अमितेशकुमार सो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.श्री. रंजन कुमार शर्मा साो, सह-आयुक्त, पुणे शहर, मा.श्री. प्रविण कुमार पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. स्मार्तना पाटील साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २ पुणे शहर, मा. राहुल आवारे सो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री. युवराज नांद्रे सो, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर, यांचे आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस हवालदार २६८४ मोराळे, पोलीस हवालवार ६५४४ तनपुरे, पो/अं १०१४७ घुले, पो/अं १००५७ पवार, पोलीस अंमलवार ७८९९ शिंदे, पो/अं ८२३७ टोणपे, पो/अं ९९६३ खेंवाड, पो/अं १००६२ शेख, पो/अं १००६८ चव्हाण, पो/अ २१९० दुबे, पो/अं १०२४४ काळे, म.पो. हवालदार ७२५७ सिताप, म. पो. हवा.७१८५ शिंदे, म.पो.अं.३००४ घायतडक, मु.पो.अं.११०८६ सांगोलकर यांनी एकत्र मिळून केली आहे.
0 Comments