पुणे :– दि.२४/१२/२०२४ रोजी अलंकार पोलीस स्टेशन हद्दीतील डी.पी. रोड येथे मॉर्निंग वॉक करीता आलेले फिर्यादी हे आयोध्या हॉटेल समोर आले असता त्यांचे गळ्यातील सोन्याची चेन दोन अनोळखी इसमांनी जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन घेऊन मोटार सायकलवर उभ्या असलेल्या तिस-या साथीदारासह निघुन गेले बाबत अलंकार पोलीस स्टेशन गु.र.नं. २११/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याबाबत मॉर्निंग वॉकला जाणारे वेगवेगळ्या व्हॉटस अॅप ग्रुपवर गुन्ह्याची माहिती प्रसारीत झाल्याने मॉर्निंग वॉक करीता जाणारे नागरिकांचे मनात भितीचे वातावरण निर्माण झाल्याने ना. पोलीस उप आयुक्त परी. ३ पुणे शहर श्री संभाजी कदम व मा. सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग, पुणे श्री अजय परमार यांनी तपासा बाबत मार्गदर्शनकरुन गुन्हा वात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे गुन्ह्याचा तपास सुरु करुन घटनास्थळावरील तसेच आजुबाजुचे परीसरातील २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेज तपासुन यातील अनोळखी आरोपीचा माग काढुन पोलीस अंमलदार पवार यांना गोपनीय बातमीदाराव्दारे सदरचा गुन्हा हा १) सुमित ऊर्फ अभिषेक उर्फ डायमंड राजु आसवरे वय १९ वर्षे रा. किष्कीदानगर पाण्याचे टाकीजवळ, कोथरुड पुणे २) अभिषेक उर्फ कानोळ्या मारत खंदारे वय-२२ वर्षे रा. किष्कीदानगर, कोथरुड पुणे यांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळवल्याने किष्ठीदानगर, कोथरुड पुणे येथे सापळा रचुन त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडे तपास करता त्यांनी त्यांचे इतर दोन फरार साथीदारांसह अशाच प्रकारे १) अलंकार पो.स्टे. गु.र.न. ३०/२०२५ ना.न्या.सं. कलम ३०९ (५), १२६ (२), ३५१ (३),३ (५) शस्त्र अधिनियम कलम ४(२५), महा. पो. अधि. ३७ (१)१३५ २) चतुः श्रृंगी पो. स्टे. पुणे शहर गुन्हा रजि. नं. ३५/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०४ (२), ३(५) प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचेकडुन वरील प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरलेल्या दोन सोन्याच्या चेन एक सोन्याचे पेंडट, गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल. एक तलवार असा एकुण २,८६,२५०/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन नमुद आरोपी कडुन शस्त्राचा धाक दाखवुन जबरी चोरीचे अलंकार पोलीस स्टेशनकडील ०२ व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनकडील ०१ असे ०३ गुन्हे उघडकीस आले आहेत दोन फरार आरोपीचा शोध चालु आहे. सदरची कामगीरी ही ना.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उपायुक्त परि.२ पुणे श्री संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग श्री अजय परमार, अलंकार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता रोकडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्री. अनिल माने यांच्या मार्दवर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक, गणेश दिक्षीत, महेश निंबाळकर, पोलीस अंमलदार धीरज पवार, सोमेश्वर यादव, शशिकांत सपकाळ, शिवाजी शिंदे, अंकुश लोंढे, साईनाथ पाटील, नवनाथ आटोळे, नितीन राऊत, माधुरी कुंभार, शंभवी माने, यांनी केली.
0 Comments